Medical Admission : मेडिकल प्रवेश आरक्षणात विलंब नको; सरकारने याविषयाकडे गंभीरपणे लक्ष द्यावे

आप, तृणमूलची बांदेकरांशी भेट; सोमवारी समिती प्रमुखांशी चर्चा
Medical Admission
Medical AdmissionDainik Gomantak
Published on
Updated on

Medical Admission : गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) आणि दंतचिकित्सा महाविद्यालयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्ग (ओबीसी) विद्यार्थ्यांच्या आरक्षण देण्यात होत असलेल्या विलंबाबाबत आम आदमी पक्ष व तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी शुक्रवारी गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांची भेट घेतली.

यावेळी आम आदमी पक्षाचे प्रा. रामराव वाघ, रामा काणकोणकर, तृणमूल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष समील वळवईकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीविषयी प्रा. वाघ म्हणाले, गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि दंतचिकित्सा महाविद्यालयात एससी-एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

किमान यावर्षीतरी या विद्यार्थ्यांना आरक्षण मिळावे, अशी आमची इच्छा आहे. चार वर्षांपूर्वी आरक्षणाची अधिसूचना काढली, पण ती नियमानुसार काढली नव्हती. त्यामुळे या प्रक्रियेला आम्ही आव्हान दिले होते. आता आरक्षण देण्याविषयी सरकारने तीन सदस्यीय समिती नेमली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ११ मे रोजी आरक्षणाविषयी अधिसूचना काढली.

Medical Admission
Goa Monsoon 2023 : पावसाचे अर्धशतक; ‘पॉवर प्ले’ सुरूच, 10 जुलैपर्यंत यलो अलर्ट

त्यामुळे नीट होऊन ६० दिवस झाले आहेत. आता १ ऑगस्टपासून प्रवेश सुरू होतील. त्यापूर्वी हा आरक्षणाचा विषय निकाली निघावा, असे सांगत प्रा. वाघ म्हणाले, १२० पैकी ६० जागा देशपातळीवर व ६० जागा स्थानिकांना मिळणार आहेत. स्थानिकांच्या ६० जागांत एस-एसटी, ओबीसींना आरक्षण दिले पाहिजे, त्यादृष्टीने आम्ही डॉ. बांदेकरांशी चर्चा केली.

आरक्षणाबाबत बांदेकर सकारात्मक

स्थानिक मुलांना आरक्षण देण्याविषयी डॉ. बांदेकर हे सकारत्मक दिसले. सोमवारी समिती प्रमुख दत्ताराम सरदेसाई यांच्याशी बैठक घेऊ असेही त्यांनी सांगितले. बहुजन विद्यार्थ्यांच्या आरक्षणाबाबत विधानसभेतही सर्व आमदारांनी प्रश्‍न विचारावेत, अशी मागणीही त्यांनी केली. वळवईकर म्हणाले, डॉ. बांदेकर आरक्षणाबाबत सकारात्मक आहेत. सरकारनेही याविषयाकडे गंभीरपणे पहावे, बहुजन विद्यार्थ्यांवर गेली १४ ते १५ वर्षांपासून अन्याय होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com