Co-Accused Granted Bail In Kamakshi Murder Case: कळंगुटमधील बुटीकमध्ये सेल्स गर्ल म्हणून काम करणारी कामाक्षी उड्डापनोवा या तरुणीचा तिच्या प्रियकराने खून केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी प्रियकर व त्याच्या मित्राला अटक करण्यात आली होती.
दरम्यान प्रियकराचा मित्र संशयित निरुपदी कडाकक्ल याला म्हापसा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कामाक्षीचा एक्स प्रियकर संशयित फकीर उर्फ प्रकाश चुंचवाड याला मदत केल्याचा निरुपदीवर आरोप आहे.
प्रेमसंबंध तोडले आणि बोलणे बंद केल्याने रागाच्या भरात पर्वरीतील कामाक्षी उड्डापनोवा या तरुणीचा तिचा प्रियकर संशयित प्रकाश याने शुक्रवारी (30 ऑगस्ट) खून केला.
गेल्या दीड वर्षांपासून ती तिचा प्रियकर प्रकाश याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला. यानंतर त्यांचे नाते तुटले.
30 ऑगस्टला सकाळी कामाक्षीच्याच फ्लॅटवर जाऊन खून करण्यात आला होता. मित्राच्या मदतीने मृतदेह गाडीत टाकला आणि महाराष्ट्रातील आंबोली घाटात फेकून दिला.
कामाक्षीच्या भावाने पर्वरी पोलिस स्थानकात कामाक्षीचे अपहरण तसेच ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता कामाक्षीचा खून केल्याचे तिच्या प्रियकराने कबूल केले.
पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर सावंतवाडी पोलिस व पर्वरी पोलिसांनी आंबोलीतील घाटातून मृतदेह बाहेर काढला. मात्र तिच्या उजवा हात आणि पायाचा काही भाग मिळाला नाही.
दरम्यान मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कामाक्षीचा एक्स प्रियकर संशयित फकीर उर्फ प्रकाश चुंचवाड याला मदत केल्याप्रकरणी मित्र संशयित निरुपदी कडाकक्ल याला अटक करण्यात आली होती. गुरुवारी म्हापसा न्यायालयाने संशयित मित्राला जामीन मंजूर केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.