Betoda Nirankal Pollution: निरंकालच्या नागरिकांना दिलासा? औद्योगिक दुर्गंधीत घट, सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले

Nirankal Bad Smell Latest News: मानवाधिकार आयोगाकडील स्वयंस्फूर्त कार्यवाही क्रमांक १०८/२०२६/८७० अंतर्गत औद्योगिक आस्थापनांमधून येणाऱ्या दुर्गंधी आणि प्रदूषणाच्या तक्रारीसंदर्भात ही पाहणी करण्यात आली.
Nirankal Bad Smell Latest News
Betoda Nirankal PollutionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: बेतोडा-निरंकाल परिसरात औद्योगिक आस्थापनांमधून येणाऱ्या दुर्गंधी आणि प्रदूषणाबाबत करण्यात आलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्य मानवाधिकार आयोगाच्या निर्देशानुसार संयुक्त स्थळपाहणी करण्यात आली. या पाहणीत युनायटेड स्पिरिट्स आणि युनायटेड ब्रुअरीज या दोन्ही आस्थापनांच्या परिसराची तपासणी करण्यात आली. पाहणीच्या वेळी दोन्ही आस्थापनांच्या परिसरात दुर्गंधी कमी झाल्याचे जाणवल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे.

मानवाधिकार आयोगाकडील स्वयंस्फूर्त कार्यवाही क्रमांक १०८/२०२६/८७० अंतर्गत औद्योगिक आस्थापनांमधून येणाऱ्या दुर्गंधी आणि प्रदूषणाच्या तक्रारीसंदर्भात ही पाहणी करण्यात आली. या संयुक्त पाहणीत गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कनिष्ठ पर्यावरण अभियंता आर्या देशपांडे, आरोग्य विभागाचे भूषण शेटकर तसेच बेतोडा-निरंकाल ग्रामपंचायतीचे सरपंच अक्षय गावकर, ग्रामपंचायत सचिव आशिष नाईक आणि पंचसदस्य माधवी खांडेपारकर उपस्थित होत्या.

Nirankal Bad Smell Latest News
Goa Pharma Export Hub: गोवा बनणार औषध निर्यातीचे नवे केंद्र? मोपा-दाबोळी विमानतळांवर मोठी तयारी!

संयुक्त पाहणीदरम्यान युनायटेड स्पिरिट्स आणि युनायटेड ब्रुअरीज या दोन्ही आस्थापनांच्या परिसरातून बेतोळा नाल्यात सांडपाणी सोडले जात असल्याचे आढळले नसल्याची नोंद अहवालात आहे. दोन्ही आस्थापनांच्या परिसरातील दुर्गंधीत घट झाल्याचे पाहणीदरम्यान जाणवल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे दुर्गंधी नियंत्रणासाठी संबंधित कंपन्यांनी केलेल्या उपाययोजनांचा परिणाम दिसत असल्याचे चित्र आहे.

युनायटेड ब्रुअरीजच्या प्रतिनिधींनी दुर्गंधी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना कालमर्यादेत राबविण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती पाहणीवेळी दिली. युनायटेड स्पिरिट्सने जैविक विकर (बायो-एन्झाइम्स) आणि जैविक दुर्गंधी नियंत्रण घटकांचा चाचणी तत्त्वावर वापर सुरू केल्याचे सांगितले. प्रक्रिया यंत्रणेतील योग्य ठिकाणी या घटकांचा वापर करण्यात येत आहे.

Nirankal Bad Smell Latest News
Goa Assembly Election: 'पक्ष सांगेल त्या मतदारसंघातून लढणार'; दामू नाईकांच्या उमेदवारीबाबत चर्चांना पूर्णविराम

तपासणीसाठी सांडपाण्याचे नमुने

संयुक्त पाहणीदरम्यान गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही आस्थापनांच्या सांडपाणी प्रक्रिया यंत्रणांमधील प्रक्रिया केलेल्या पाण्याचे नमुने गोळा केले. युनायटेड स्पिरिट्सच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील (ईटीपी) आणि सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पातील (एसटीपी) पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.

या नमुन्यांच्या तपासणीतून पाण्याची गुणवत्ता आणि संबंधित मानकांचे पालन होते की नाही, याबाबत अधिक स्पष्टता मिळू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com