Goa Assembly Election: 'पक्ष सांगेल त्या मतदारसंघातून लढणार'; दामू नाईकांच्या उमेदवारीबाबत चर्चांना पूर्णविराम

Damu Naik Election Statement: दामू नाईक फातोर्ड्यातून नव्हे, तर शिरोड्यातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत विचारले असता, या केवळ अफवा असल्याचे त्यांनी सांगितले.
Damu Naik statement on Goa Assembly elections
Goa Assembly election 2027 BJP candidatesDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: भाजपची मजबूत संघटना असून, कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी निवडणूक जिंकू. काही लोकांच्या पायाखालची जमीन सरकल्यामुळे माझ्या उमेदवारीबाबत खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केली.

दामू नाईक फातोर्ड्यातून नव्हे, तर शिरोड्यातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत विचारले असता, या केवळ अफवा असल्याचे त्यांनी सांगितले. मी भाजपचा निष्ठावान सैनिक असून, पक्षाच्या विजयासाठी कठोर परिश्रम करेन. पक्षाने आदेश दिल्यास सांगेल त्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी आहे, असे ते म्हणाले.

Damu Naik statement on Goa Assembly elections
Goa Politics: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-मगो एकत्रच लढणार; युतीचा अंतिम निर्णय दिल्ली दरबारी!

दरम्यान, फातोर्डा येथे पोस्टर्स आणि बॅनर्स फाडण्यात आल्याच्या प्रकारावर नाईक यांनी विरोधकांवर निशाणा साधला. एका ठरावीक व्यक्तीला आणि त्याच्या ‘चमच्यांना’ माझी भीती वाटू लागल्यानेच त्यांनी माझे बॅनर्स फाडले, असा आरोप त्यांनी केला.

नगरपालिकेचा आवश्यक कर भरून आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बॅनर्स लावले होते. मात्र, समाजकंटकांनी ते जाणीवपूर्वक खराब केले. बॅनर्स फाडले म्हणून लोकांच्या मनातील माझे स्थान कुणीही पुसू शकणार नाही, असे नाईक म्हणाले.

Damu Naik statement on Goa Assembly elections
Goa Political Reservation: 2027च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय आरक्षण प्रक्रिया पूर्ण करा; अनुसूचित जमातींचा सावंत सरकारला अल्टीमेटम!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com