Nilesh Cabral : जागा दिल्यास पाणीप्रश्‍न सोडवू ;अन्यथा राजीनामा

नीलेश काब्राल : चांदेल प्रकल्पाच्या भेटीप्रसंगी लोकप्रतिनिधींसमोर ग्वाही; टाकीसाठी जमीन नाही
Pravin arlekar
Pravin arlekarGomantak Digital Team
Published on
Updated on

Nilesh Cabral : विस्तारित पाणी प्रकल्पातील चांदेल प्रकल्पासाठी आवश्यक असलेली टाकी उभारण्यासाठी जागा मिळाली तर एका वर्षात पेडणे तालुक्याची पाण्याची समस्या सोडवू, अन्यथा मंत्रिपदाचा राजीनामा देऊ; अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी बुधवारी पेडणे तालुक्यातील लोकप्रतिनिधींसमोर बोलताना दिली.

पेडणे तालुक्यात सध्या पाण्याची समस्या गंभीर बनली असून दोन्ही तालुक्यातील आमदारांना लोकांचा रोष पत्करावा लागत आहे. त्यामुळे ५ रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी चांदेल पाणी प्रकल्पाला भेट दिली.

Pravin arlekar
RBI Repo Rate Hike: सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी, RBI गर्व्हनर यांची महत्वाची घोषणा....

यावेळी यावेळी पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तथा चांदेल सरपंच तुळशीदास गावस, वारखंड सरपंच गौरी जोसालकर कासारवर्णे सरपंच नवनाथ नाईक ,तोर्से सरपंच प्रार्थना मोटे, मोपा सरपंच सुबोध महाले, मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Pravin arlekar
Crime News: भयंकर! पगार पुरेना म्हणून कर्मचाऱ्यांनी हॉटेलमध्येच सुरू केला हा 'उद्योग'; जोडप्यांचा...

काब्राल पुढे म्हणाले, की पाणी विस्तारित प्रकल्प मे महिन्यात पूर्ण होणार आहे. टाकी साठी जागा उपलब्ध झाली तर आपण एका वर्षाच्या आत पाण्याची समस्या सोडवू अन्यथा आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ. मागील सरकारने चांदेल पाणी प्रकल्पाच्या विस्तारासाठी व टाक्यांसाठी जागा नसल्याने बांधकाम खात्याला अडचणी येत आहेत,असेही ते म्हणाले.

Pravin arlekar
Manoj Bajpayee: "तू चांगला दिसत नाहीस !" मनोज वाजपेयीला टॉपची हिरॉईन बोलली, नंतर यश चोप्रांनीही पुन्हा संधी नाही दिली...

प्रश्‍नांची सरबत्ती; अधिकाऱ्यांची भंबेरी !

यावेळी मंत्री नीलेश काब्राल यांनी पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाणी कुठे नक्की मुरते, याविषयी आमदारांच्या उपस्थितीत गरमागरम चर्चा केली. विस्कळीत पाणी पुरवठ्याबाबत सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 15 एमएलडी पाणी प्रकल्पातून नक्की पाणी कुठे जाते? याची पूर्ण माहिती द्यावी, अशी मागणी यावेळी केली.

अधिकाऱ्यांनी यावेळी वेगवेगळी उत्तरे दिली. कुणीतरी सांगितले, 12 एमएलडी पाणी, कुणी13 आणि कुणीतरी 15 एमएलडी पाणी दर दिवशी वितरीत केले जाते. त्यावर काब्राल यांनी नक्की पाणी कुठे मुरते? याचा हिशोब द्या आणि जिथे पाणी नासाडी होते, त्यावरही उपाययोजना करा,अशी सक्त ताकीदवजा सूचना केली.

Pravin arlekar
KTC New Buses For G20 Summit: गोव्यातील G20 बैठकीच्या पार्श्वभुमीवर 'कदंबा' खरेदी करणार मोठ्या आकाराच्या नवीन 100 बसेस

विविध पंचायतींच्या सरपंचांनी मांडली पाणीप्रश्‍नी आपापली व्यथा

पेडणे तालुक्यातील विविध पंचायतीच्या सरपंचांनी आपापल्या पंचायत क्षेत्रात कशी पाणी टंचाई आणि समस्या उद्भवते याची माहिती दिली.पाण्याची समस्या सोडवण्यासाठी गाव पातळीवरून एकूण 24 नवीन टाक्या उभारण्यात येणार आहेत, त्यातील एकूण14 टाक्या बांधून पूर्ण झालेल्या आहेत. उर्वरित टाक्या बांधण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती यावेळी मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.

Pravin arlekar
Sanquelim : ‘सेसा फॉर ग्रीनर गुड’ द्वारे वेदांता सेसा गोवाची जागृती

यावर काही सरपंचांनी प्रती प्रश्न उपस्थित करत असताना ज्या पूर्वीच्या टाक्या बांधलेल्या आहेत, त्या टाक्यापर्यंत या चांदेल पाणी प्रकल्पाचे पाणी जात नाही. तर त्या टाकीमध्ये पाणीपुरवठा भविष्यात कसा होईल ? असा सवाल केला यावरही काब्राल यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून महत्त्वाच्या सूचना केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com