Suleman Khan: पालेकरांची चौकशी, काब्रालांची का नाही? सुलेमान प्रकरणी मुख्‍यमंत्र्यांनी लक्ष घालावे; नगरसेवक होडारकरांची मागणी

Balkrishna Hodarkar: मुख्यमंत्र्यांनी काब्राल यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, अशी मागणी होडारकर यांनी केली.
Nilesh Cabral, Amit Palekar
Nilesh Cabral, Amit PalekarDainik Gomantak
Published on
Updated on

Suleman Khan Case Nilesh Cabral Connection

केपे: ‘कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी एका अधिकाऱ्यावर दबाव आणून आपल्याला फसविण्याचा प्रयत्न केला’ असा जो आरोप जमीन घोटाळ्यातील संशयित आरोपी सुलेमान सिद्दीकी याने केला आहे. त्‍याची गंभीर दखल मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घ्‍यावी.

तसेच चौकशी सुरू करावी, अशी मागणी कुडचडेचे माजी नगराध्‍यक्ष आणि विद्यमान नगरसेवक बाळकृष्‍ण ऊर्फ पिंटी होडारकर यांनी केली आहे. अशा प्रकारांमुळे कुडचडे मतदारसंघाची बदनामी होत आहे, असेही त्‍यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सिद्दीकी याला ५ मार्च रोजी न्यायालयात नेताना त्‍याने पत्रकारांकडे पेपर फेकले होते. त्यात त्याने वरील आरोप केला आहे. त्‍यामुळे मुख्यमंत्र्यांनी काब्राल यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, अशी मागणी होडारकर यांनी केली.

Nilesh Cabral, Amit Palekar
Suleman Khan Case: सुलेमान खान प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी करा! चोडणकरांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

काही दिवसांपूर्वी काब्राल हे मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे आपली कामे पूर्ण करून द्यावीत अशी मागणी करत होते. पण जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ गावस देसाई यांनी आपल्या या कार्यकाळात अनेक कामे सुरू करून, ती पूर्ण करून, रीतसर उद्‍घाटनही केले आहे. यावरून लोकांची कामे करून देण्याची कुवत कोणामध्ये आहे हे कळून येते, असा टोला होडरकर यांनी हाणला.

Nilesh Cabral, Amit Palekar
Suleman Khan: जोशुआ-काब्राल यांच्‍याकडून दबाव, 5 कोटींची ऑफर; सुलेमानने कोर्ट आवारात फेकलेल्‍या कागदपत्रातील कथित आरोप

काब्राल यांना दिले खुले आव्‍हान

नीलेश काब्राल यांचे मंत्रिपद काढून घेतले तेव्‍हा त्यांनी आपण भाजपचा कार्यकर्ता असून पक्षाने विनंती केल्यामुळे मंत्रिपद सोडले असे म्‍हटले होते. त्‍यामुळे आता त्यांनी लोकांना हेही सांगितले पाहिजे की, जर पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली नाही तर पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याच्यासोबत आपण राहणार आहे. वास्‍तविक भाजपने उमेदवारी नाकारली तर कोणत्या पक्षात उडी घ्‍यायची याची आतापासूनच ते तयारी करत आहेत, असा आरोपही होडारकर यांनी केला.

‘आप’चे अमित पालेकर यांची अनेकदा पोलिस स्थानकात बोलावून चौकशी करण्‍यात आली आहे. तशीच चौकशी नीलेश काब्राल यांची करावी. त्‍यामुळे सिद्दीकीच्‍या म्हणण्यात सत्य आहे की नाही हे समजले.

बाळकृष्‍ण होडारकर (नगरसेवक, कुडचडे)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com