Drug Trafficking Case: लग्नाचे रिसेप्शन, आईच्या शस्त्रक्रियेचे कारणही ठरले निष्फळ! क्रिप्टो-हवाला प्रकरणातील संशयिताचा अंतरिम जामीन कोर्टानं फेटाळला

Goa Court Bail Rejection: संशयिताची ४ ऑगस्ट २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
Goa Court Bail Rejection
Crypto Hawala Drug Trafficking CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: लग्नाचे रिसेप्शन आणि आईच्या शस्त्रक्रियेचे कारण देत अंतरिम जामिनासाठी अर्ज करणाऱ्या क्रिप्टो-हवाला व अमलीपदार्थ तस्करीशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणातील संशयित निहाल व्ही. एन. याचा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश विजया आंब्रे यांनी अंतरिम जामीन अर्ज फेटाळला आहे.

संशयित मूळ केरळचा असून त्याच्याविरुद्ध ‘लुक आउट सर्क्युलर’ जारी करण्यात आले होते व त्याला मुंबई विमानतळावर रोखण्यात आले होते, ही महत्त्वपूर्ण माहिती न्यायालयापासून लपवण्यात आल्याचे खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले.

Goa Court Bail Rejection
लुथरा बंधू साडेतीन महिन्यांनंतर आले कोठडीबाहेर, 'एनओसी' प्रकरणातही जामीन; प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलणे टाळले

निहाल व्ही. एन. यांच्या वकिलांनी न्यायालयात ३१ जुलै २०२६ रोजी केरळ येथील राजगिरी रुग्णालयात आईवर होणारी वैद्यकीय शस्त्रक्रिया आणि १५ ऑगस्ट २०२६ रोजी नियोजित असलेले स्वतःच्या लग्नाचे रिसेप्शन आणि त्यासंबंधित कौटुंबिक व्यवस्थापन अशी कारणे दिली होती.

४ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

जरी संशयिताच्या खात्याशी प्रत्यक्ष जोडलेली रक्कम ७.८८ लाख रुपये असली, तरी हे प्रकरण केवळ तेवढ्यापुरते मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय स्तरावरील अमलीपदार्थांच्या तस्करीत आणि हवाला रॅकेटमध्ये त्याचे थेट संबंध तपासले जात आहेत. संशयिताची ४ ऑगस्ट २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com