मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोक्यात; पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

NH 66 Malpe Retaining Wall Crack: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोकादायक स्थितीत आली असून पावसाळ्यात ती कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
NH 66 Malpe Retaining Wall Crack
NH 66 Malpe Retaining Wall CrackDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोकादायक स्थितीत आली असून पावसाळ्यात ती कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पेडणे विकास मंचाचे संस्थापक डॉ. संजय कोरगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकतीच या परिसराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सरकार आणि संबंधित विभागाने तातडीने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली.

राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या बायपास मार्गाच्या बांधकामादरम्यान मालपे येथे उभारण्यात आलेली संरक्षक भिंत गेल्या दोन वर्षांपासून धोकादायक अवस्थेत आहे. गेल्या वर्षी भिंतीचा काही भाग कोसळून मोठी दरड घसरली होती. त्यामुळे हा महामार्ग काही काळ सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला होता.

NH 66 Malpe Retaining Wall Crack
New Borim Bridge: नवीन बोरी पुलासाठी 1000 कोटींचा आराखडा! अडीच वर्षांत काम होणार पूर्ण; ढवळीतून निघणार बगलरस्ता

यंदाच्या पावसाळ्यात अशीच परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

डॉ. संजय कोरगावकर यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्गावरील या धोकादायक संरक्षक भिंतीकडे सरकार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

NH 66 Malpe Retaining Wall Crack
Bicholim Weather: विजेच्या लखलखाटासह डिचोलीत जोरदार पाऊस; अनेकांची तारांबळ, पावसामुळे हवामानात गारवा

कोणतीही जीवितहानी अथवा वाहतुकीचा खोळंबा होण्यापूर्वीच तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी केली.दरम्यान, गेल्या वर्षी मे महिन्यात हा महामार्ग तब्बलसहा महिने बंद ठेवण्यात आला होता. गोव्याकडे येणाऱ्या वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे. आता या संरक्षण भिंतीला एक भेग पडली आहे. एक वर्षात अशा प्रकारे भेग पडल्याने कामाच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाला आहे.

अभियंत्यांची चौकशी करावी

वजरीचे माजी सरपंच अनिल शेट्ये यांनीही या विषयावर चिंता व्यक्त केली. ही संरक्षक भिंत पुन्हा कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ज्या कंत्राटदाराने हे काम केले आणि त्यावेळी कार्यरत असलेल्या अभियंत्यांची सरकारने चौकशी करावी.

NH 66 Malpe Retaining Wall Crack
Goa Mansoon Tourism: दरीतून येणारा गार वारा अन् कोसळणाऱ्या धबधब्यांचा थरार; पावसाळी पर्यटनाचं नंदनवन मुंबई-पुण्याजवळचं 'हे' परफेक्ट डेस्टिनेशन

संबंधित कंत्राटदाराकडून नव्याने आणि सुरक्षित पद्धतीने संरक्षक भिंत उभारून घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

पावसाळ्यात ही भिंत काेसळल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते, त्यामुळे याकडे अत्यंत गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. कारण, या महामार्गावर आता मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com