Bicholim Weather: विजेच्या लखलखाटासह डिचोलीत जोरदार पाऊस; अनेकांची तारांबळ, पावसामुळे हवामानात गारवा

Goa Unseasonal Rain: विजेचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह आज रात्री डिचोलीत सर्वत्र जोरदार अवकाळी पाऊस पडला. कालही पाऊस पडला होता.
Goa Unseasonal Rain
Goa Unseasonal RainDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: विजेचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह आज रात्री डिचोलीत सर्वत्र जोरदार अवकाळी पाऊस पडला. कालही पाऊस पडला होता. मात्र, कालच्या तुलनेत आज पावसाचा जोर होता. पावसामुळे पडझड किंवा अन्य कोणतीही वाईट घटना घडली नसली, तरी घराबाहेर असलेल्या प्रवाशांसह अन्य नागरिकांची तारांबळ उडाली.

रात्री घरी परतण्याच्या वेळीच अनेकजण वाटेत अडकून पडले, पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला मोठा दिलासा मिळाला. सायंकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास विजेचा लखलखाट आणि गडगडाटांसह वारा सुटला. पाऊणतास जोरदार पर्जन्यवृष्टी झाली.

Goa Unseasonal Rain
Sattari Unseasonal Rain: सत्तरीला चक्रीवादळाचा तडाखा; झाडांची पडझड, घरांचे नुकसान; वीज, पाणी व दूरसंचार सेवा ठप्प

डिचोलीसह सर्वण, कुडचिरे आदी भागात पाऊस पडला. पावसामुळे घरी परतणारे कामगार आदी प्रवाशांचे हाल झाले. बरेचजण अडकून पडले. पावसामुळे अनेकठिकाणी रस्त्यावर पाणी दिसून येत होते. पावसामुळे डिचोलीत रात्री उशिरापर्यंत झाडांची पडझड वा अन्य कोणतीच विपरीत घटना घडली नाही, अशी माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com