Colvale Central Jail: अमली पदार्थ, मोबाईल तस्करी, कैद्यांमध्ये हाणामारी; गोव्यातील मध्यवर्ती कारागृहात अंदाधुंद कारभार

Colvale Central Jail Controversy: सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणारे बहुचर्चित कोलवाळ मध्यवर्ती कारागृह पुन्हा प्रकाशझोतात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच या कारागृहात एका अंडर ट्रायल कैद्याच्या डोळ्यात एका कैद्याने पेन खुपसले.
Colvale Central Jail: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात अंदाधुंद कारभार, वाढत्या कारनाम्यांकडे तुरुंग प्रशासनाचं दुर्लक्ष; कैद्यांवर वचक ठेवण्यात अपयश
Central Jail Colvale GoaDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणारे बहुचर्चित कोलवाळ मध्यवर्ती कारागृह पुन्हा प्रकाशझोतात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच या कारागृहात एका अंडर ट्रायल कैद्याच्या डोळ्यात एका कैद्याने पेन खुपसले. याच कारागृहातून अमली पदार्थ, मोबाईल तस्करी, कैद्यांमधील सूड भावनेने होणारे आपापसांतले हल्ले अशा अनेक कारणांवरून कारागृहाला लागलेले ग्रहण अद्याप सुटलेले नाही. या सततच्या कारनाम्यांकडे तुरुंग प्रशासन आणि सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे अधोरेखित होते.

या कोलवाळ कारागृहाची कैद्यांची क्षमता ६२४ असून, तिथे सध्या ६१६ कैदी आहेत. यामध्ये शिक्षा झालेल्या तसेच खटल्यांवर सुनावणी सुरू असलेल्या कैद्यांचा समावेश आहे. गेल्या ३ वर्षांत तुरुंग अधिकाऱ्यांनी छाप्यावेळी ३१७ मोबाईल्स जप्त केले; परंतु पोलिसांनी किती प्रकरणांचा कसून तपास केला हे गुलदस्त्यातच आहे.

Colvale Central Jail: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात अंदाधुंद कारभार, वाढत्या कारनाम्यांकडे तुरुंग प्रशासनाचं दुर्लक्ष; कैद्यांवर वचक ठेवण्यात अपयश
Colvale Central Jail: कोलवाळ कारागृह पुन्हा चर्चेत, आता चिकनवरुन कैद्यांत हाणामारी

गुन्हेगारी प्रकरणे दडपण्याचे प्रकार

दोनच दिवसांपूर्वी अजीज आसिफ याच्या डोळ्यात एका कैद्याने पेन खुपसले. हे पेन कैद्याकडे आले कसे, हा मोठा प्रश्न पडतो. तसेच अजीजने या कैद्याला आपल्या सेलमध्ये सोबत ठेवू नये, अशी मागणी केली होती. असे असताना वैरी कैद्यांना एकत्रितपणे ठेवण्यावरून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांत तुरुंग प्रशासनाने तक्रार दिलेली नाही. जखमी कैद्याला जिल्हा इस्पितळात उपचारासाठी आणले होते. त्याला माघारी घेऊन जाताना कैद्याने माध्यमांचे कॅमेरे पाहून तोंड उघडल्याने हे प्रकरण समोर आले. अन्यथा दुखापत मोठी नव्हती, असे सांगून हे प्रकरण तुरुंगातच मिटविले असते, असा बोलबाला आहे.

Colvale Central Jail: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात अंदाधुंद कारभार, वाढत्या कारनाम्यांकडे तुरुंग प्रशासनाचं दुर्लक्ष; कैद्यांवर वचक ठेवण्यात अपयश
Colvale Central Jail : कारागृहात ड्रग्ज तस्करीप्रकरणी 9 तुरुंगरक्षकांविरोधात कारवाई

तुरुंगात छळ केल्याचा आरोप

कोलवाळ येथे एकमेव मध्यवर्ती कारागृह आहे. या कारागृहात जॅमर बसविले नसल्याने मोठ्या प्रमाणात मोबाईल (Mobile) तस्करीची प्रकरणे अधून-मधून समोर येतात. यातील काही प्रकरणे आतल्या आतच मिटविली जातात, असा आरोप आहे. या कारागृहात महिन्यातून एकदा तरी नवीन प्रकरण समोर येतेच. मध्यंतरी, एका अंडरट्रायल कैद्याने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यात तो कैदी ४० टक्के भाजला होता. तुरुंगात छळ होत असल्याने त्याने हे पाऊल उचलले होते, अशी चर्चा होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com