New Zuari Bridge : प्रतीक्षा संपली; अखेर झुआरी पुल वाहतुकीसाठी खुला

वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर पहिल्यांदाच या पुलाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांचं पोलीस आणि प्रशासनाकडून स्वागत करण्यात आलं.
New Zuari Bridge
New Zuari BridgeDainik Gomantak

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्धाटनानंतर अखेर नवीन झुआरी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर पहिल्यांदाच या पुलाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांचं पोलीस आणि प्रशासनाकडून स्वागत करण्यात आलं. तसंच पोलिस अधिकाऱ्यांनी वाहनचालकांना गुलाबपुष्पही दिलं. झुआरी पूल उद्घाटनानंतरही सुरु करण्यात न आल्यामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त केला होता. सकाळपासूनच पणजी-मडगाव मार्गावर वाहनांच्या पुन्हा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिसांनी हा पूल वाहतुकीसाठी खुला करत कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

Zuari Bridge Traffic Movement
Zuari Bridge Traffic MovementDainik Gomantak

2,530 कोटींच्या भव्य झुआरी प्रकल्पातील मुख्य टॉवरवर रिव्हॅलविंग रेस्टॉरंट आणि व्हीविंग गॅलरी उभारण्याचा प्रस्ताव आहे. यासंबंधी यापूर्वी दोनदा काढलेल्या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. यासाठी आता केंद्र व राज्य सरकार काही पैशांची गुंतवणूक करून हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली आहे.

New Zuari Bridge
New Zuari Bridge: झुआरी पुल खुला होताच 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने केला पुलावरून प्रवास

दरम्यान गोव्यात वाहतुकीचं जाळं पसरवण्यासाठी केंद्राचे प्रयत्न सुरुच आहेत. पत्रादेवी-पाळोळे या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून पत्रादेवी-दोडामार्ग-केरी-मोले-पाळोळे अशा बायपासला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. जमीन अधिग्रहण करण्यासाठीचे 50 टक्के पैसे आणि स्टील, सिमेंटवरचा जीएसटी खर्च राज्य सरकार भरण्यास तयार असल्यास या पुलाच्या अंतिम सर्वेक्षणानंतर मंजुरी देण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com