New Wetlands in Goa: गोव्यातील नवीन 8 जागा पाणथळ म्हणून घोषित होणार

नागरिकांसाठी 60 दिवसांची नोटीस
New Wetlands in Goa
New Wetlands in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

New 8 Wetlands To Be Declared in Goa: गोवा राज्य सरकारने पाणथळ जमीन (संवर्धन आणि व्यवस्थापन) नियम, 2017 च्या नियम 7 अंतर्गत एक मसुदा अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार नवीन 8 नवीन जागा पाणथळ म्हणून घोषित करण्यात येणार आहेत.

मसुदा अधिसूचनेचा उद्देश संबंधित स्थळांच्या पर्यावरणीय वैशिष्ट्यांची जपणूक करणे, संवर्धन करणे आणि उक्त जलस्रोतांच्या हद्दीतील तसेच प्रभाव क्षेत्रामध्ये विकास कामांचे नियमन करणे हा आहे.

New Wetlands in Goa
Goa University: गोवा विद्यापीठात जानेवारीपर्यंत उभारणार रिसर्च पार्क; Bio-Engg मध्ये पदवी अभ्यासक्रम सुरू करणार...

यात वास्कोमधील मायमोल्ले तलाव (2,66,627 चौरस मीटर क्षेत्रफळ), वेर्णा येथील अंबुलोर तलाव (5,393 चौ. मीटर), राया येथील बाकभट्ट तलाव (75,009 चौ. मीटर), बेबकी, (10,525 चौ.मी.), बाणावली येथील कमला तलाव (8,050 चौ. मीटर), सासष्टी तालुक्यातील लागोआ डी सिमा तलाव (1,56,686 चौ. मीटर), डिचोलीतील लामगाव तलाव (3,375 चौ. मीटर), शिरोड्यातील मोईंगल तलाव (2,717 चौ. मी.) आणि कुठ्ठालीतील वोडले धाकटे तलाव (87,126 चौ.) या तलावांचा समावेश आहे.

पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या गोवा राज्य पाणथळ प्राधिकरणाच्या (GSWA) 13 व्या बैठकीत या तलावांना पाणथळ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. जलकुंभांना पाणथळ म्हणून घोषित करण्यापूर्वी सरकारने नागरिकांसाठी 60 दिवसांची नोटीस दिली आहे.

New Wetlands in Goa
गोव्यात होणार TVS MotoSoul बाईकिंग फेस्टिव्हल; इंडिया बाइक वीक, रॉयल एनफिल्ड रायडर मॅनियाचेही आयोजन...

या तलावांच्या हद्दीत कोणत्याही प्रकारच्या अतिक्रमणावर बंदी घालण्यात आली आहे. विचाराधीन जमिनीच्या पर्यावरणीय समतोलावर परिणाम होणार नाही, अशा विद्यमान उद्योगांच्या आधुनिकीकरणाचा अपवाद वगळता कोणताही उद्योग उभारण्यास अथवा कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास देखील या जमिनीत बंदी असेल.

या तलाव क्षेत्रात बोट जेटी, वाळू उत्खनन, शिकार, पर्यावरणास अडथळा ठरेल असे कोणतेही कायमस्वरूपाचे बांधकाम प्रतिबंधित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com