Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Water Taxi Goa: राज्यात वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी याची अंमलबजावणी बंदर कप्तान खात्याकडे सोपवायची की नदी परिवहन खात्याकडे याचा पेच सुटलेला नाही.
Goa water taxi project
Goa water transport planDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी याची अंमलबजावणी बंदर कप्तान खात्याकडे सोपवायची की नदी परिवहन खात्याकडे याचा पेच सुटलेला नाही. कोची येथे वॉटर मेट्रो सेवा यशस्वीपणे चालवणारे कोची सरकारचे पथक पाहणीसाठी आता गोव्यात येणार आहे.

गोव्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे परिमाण देणारी वॉटर टॅक्सी सेवा लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारने या योजनेला मंजुरी दिली असून, किनारपट्टी व खाडी परिसरात प्रवाशांना जलमार्गाने प्रवासाची नवी सुविधा उपलब्ध होणार आहे.

पणजी ते हळदोणे,पणजी ते साखळी, पणजी ते सावर्डे, पणजी ते वास्को, बेतुल ते पणजी अशा काही जलमार्गांचा विचार यासाठी सरकारने चालवला आहे. नदी परिवहन खात्याचे संचालक विक्रमसिंह राजेभोसले हे गेल्या आठवड्यात या वॉटर टॅक्सीच्या अभ्यासासाठी कोची येथे गेले होते. मात्र बेती फेरीबोट बुडाल्याने त्यांना अभ्यासदौरा अर्धवट सोडून गोव्यात परतावे लागले होते.

Goa water taxi project
Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार जलटॅक्सी! 4 मार्गांवर होणार जलवाहतूक; कोची मेट्रो रेलकडून अभ्यास

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉटर टॅक्सीमुळे गोव्यातील अंतर्गत वाहतूक सुलभ होईलच, पण पर्यटनालाही चालना मिळेल. पारंपरिक रस्ते व रेल्वे वाहतुकीपेक्षा जलवाहतूक अधिक जलद, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक असल्याने शासनाने यावर भर दिला आहे.

Goa water taxi project
Goa Water Crisis: गोवावासीयांसमोर भीषण पाणीसंकट! राज्यात 62 MLD पाण्याची तूट; तक्रारींचा वाढला ओघ

मांडवी, झुआरी पात्रात पायलट प्रकल्प

पायलट प्रकल्पाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात मांडवी व झुआरी नद्यांवर काही मार्गांवर वॉटर टॅक्सी चालवली जाणार आहे. या टॅक्सींमध्ये जीपीएस, सुरक्षा जॅकेट्स, सुसज्ज इंजिन्स आणि प्रशिक्षित चालक असतील. दरम्यान, दररोज कार्यालयीन वेळात व सायंकाळच्या प्रवासासाठी टॅक्सींची संख्या वाढवली जाणार आहे. राज्यातील वाहतूक कोंडी कमी करणे, पेट्रोल व डिझेलवरील अवलंबन कमी करणे आणि पर्यावरण पूरक पर्याय निर्माण करणे, या हेतूने ‘ब्ल्यू ट्रान्स्पोर्ट इनिशिएटिव्ह’ अंतर्गत ही सेवा उभारली जात आहे. तांत्रिक चाचण्या आणि मंजुरीनंतर येत्या काही महिन्यांतच ही सेवा प्रत्यक्षात सुरू होईल, अशी माहिती उच्च अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com