Goa Highway: 3 महिन्यांत हायवेची संरक्षक भिंत खचली, वाहनधारकांत भीती; उपजिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

Pernem Malpe Highway: मालपे येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर नव्याने बांधण्यात आलेल्या महामार्गाच्या बाजूची एक संरक्षक भिंत काही प्रमाणात कलली असून त्यामुळे वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांत भीती पसरली आहे.
Goa Highway
Pernem Malpe Highway NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: मालपे येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर नव्याने बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूची एक संरक्षक भिंत काही प्रमाणात कलली असून त्यामुळे महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांत भीती पसरली आहे. उपजिल्हाधिकारी शिवकुमार नाईक यांनी या ठिकाणी महामार्गाची पाहणी केली. दरम्यान, डोंगराची कोसळलेली माती संरक्षक भिंतीवर स्थिरावली.

मालपे येथे राष्ट्रीय महामार्गासाठी दोन्ही बाजूचे डोंगर कापून नव्याने मार्ग तयार करण्यात आला आहे. गेल्या वर्षी हा मार्ग खुला केल्यानंतर अल्पावधीतच येथील महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या डोंगरांची माती व संरक्षक भिंती महामार्गावर कोसळल्याने गतवर्षी हा महामार्ग सुमारे आठ महिने बंद ठेवला होता.

Goa Highway
Malpe Highway: 8 महिन्यांनी मालपे महामार्ग खुला! मुंबईहून गोव्याकडे येणारी वाहतूक जुन्या महामार्गाने सुरू

त्यानंतर कोसळलेली माती काढून तसेच या ठिकाणी नव्याने संरक्षक भिंती बांधून पुन्हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला होता. पण त्यानंतर आता केवळ तीन महिन्यांच्या आतच पावसाळा सुरू झाल्यावर ही संरक्षक भिंत काही प्रमाणात कलली आहे. तर काही ठिकाणी डोंगरावरील माती कोसळून संरक्षक भिंतीवर येऊन स्थिरावली आहे. त्यामुळे या संरक्षक भिंतीवर मातीच्या वजनाचा दाब आलेला आहे.

Goa Highway
Malpe Pernem: दरड कोसळणार नाही कशावरून? मालपे-पेडणे महामार्गाबाबत नागरिकांच्या मनात भीती कायम

मातीचा हा दाब या संरक्षण भिंती पेलू शकतील का, असा प्रश्‍नही उद्‍भवला आहे. यामुळे या महामार्गावरून जाताना वाहनधारक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. यासंबंधी आपण सार्वजनिक बांधकाम खात्याला कळवणार असून त्याबाबत ते निर्णय घेतील, असे पेडण्याचे उपजिल्हाधिकारी शिवकुमार नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com