
Malpe National Highway 66 Updates
पेडणे: मालपे येथे राष्ट्रीय महामार्ग ६६ वर जुलैमध्ये दरड कोसळून बंद झालेल्या महामार्गाची आज मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली, तर महामार्गाच्या दुसऱ्या बाजूचे काम सुरू असल्याने मुंबईहून गोव्याकडे येणारी वाहतूक पूर्वीच्याच जुन्या महामार्गाने सुरू ठेवली आहे.
दरड कोसळ्ल्याने या ठिकाणी जुन्या महामार्गावरून वाहतूक वळवण्यात आली होती,. पण नवा मार्ग बराच खाली व जुना महामार्ग उंचावर, त्यातच या ठिकाणी वाहनांना कठीण वळणे घ्यावी लागत होती. यामुळे बसगाड्या, ट्रक, कंटेनर यासारख्या अवजड वाहनांना वाहतूक करणे बरेच कठीण व धोक्याचे झाले होते.
अशा या धोकादायक मार्गामुळे या ठिकाणी अनेक अपघातही घडत होते. आता या महामार्गाची एक बाजू सुरू केल्याने या ठिकाणी अवजड वाहनांची होणारी समस्या सुटली आहे तसेच अपघाताचा धोका कमी झाला आहे. मात्र, मुंबईहून गोव्याकडे येताना उतरणी असल्यामुळे अवजड वाहनांसाठीचा धोका कायम आहे.
या महामार्गाच्या दुसऱ्या बाजूची संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. सध्या सुरू असलेले हे काम पाहता तीन ते चार महिने तरी लागतील असा अंदाज आहे.
1. मालपे - न्हयबाग या गावांच्या मध्ये असलेल्या जुन्या महामार्गाला चढण व वळणे आहेत. तसेच अंतर कमी व्हावे म्हणून एमव्हीआर कंपनीतर्फे डोंगर कापून या ठिकाणी नवीन महामार्ग करण्यात आला होता.
2. एमव्हीआर कंपनीने एप्रिल २०२४ मध्ये या नवीन चारपदरी महामार्गाचे काम पूर्ण झाल्याचे जाहीर करून महामार्ग वाहतुकीस खुला केला होता.
3. हा मार्ग करताना मार्गाच्या दोन्ही बाजूचे डोंगर निमुळते न कापता उभे कापल्याने पावसाळ्यात १२ जून २०२४ रोजी दरड कोसळून एका बाजूचा महामार्ग बंद झाला.
4. त्यानंतर १७ जुलै २०२४ रोजी संध्याकाळी पुन्हा दोन्ही बाजूंची दरड मोठ्या प्रमाणात कोसळल्याने महामार्ग पूर्णतः बंद करण्यात आला.
5. दरड हटविणे व कोसळलेल्या संरक्षक भिंतीचे बांधकाम सप्टेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल असे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम खात्याने जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात मार्गाची एक बाजू सुरू करण्यास आठ महिने लागले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.