Panjim Municipal Corporation: महानगरपालिकेच्या नूतन इमारतीला मुहूर्त कधी?

नवीन इमारत उभारणीसाठी 11 कोटींची तरतूदही करण्यात आली आहे.
Panjim  Municipal Corporation
Panjim Municipal CorporationDainik Gomantak
Published on
Updated on

Panjim Municipal Corporation: महानगरपालिकेच्या नूतन इमारत उभारणीला मुहूर्त मिळणार तर कधी? असा प्रश्‍न पडला आहे. इमारत बांधण्यासाठी विद्यमान कार्यालयाच्या दक्षिणेकडील इमारतीचा भाग पाडलेला आहे. त्याशिवाय ती जागाही बाजूने पत्रे लावून संरक्षित करण्यात आली आहे. परंतु इमारत उभारण्याबाबत ज्या गतीने हालचाली होणे अपेक्षित होते, त्या गतीने होत नसल्याचे दिसून येत आहे.

Panjim  Municipal Corporation
Mormugao Municipality: पालिका इमारत नूतनीकरणाचा खर्च वाढला

महानगरपालिकेने नव्या इमारत उभारणीसाठीचा ठराव मंजूर केल्यानंतर त्याविषयी काही परवानग्या घेऊन आराखडा तयारही केला. तीन महिन्यांपूर्वी मुख्य इमारतीच्या दक्षिणेकडील कार्यालयाचा काही भाग पाडून टाकला. त्याशिवाय काही दिवसांत इमारत उभारणीचा शुभारंभही करण्याचे ठरले, पण नियोजन विकास प्राधिकरणाची (पीडीए) माशी शिंकली आणि हे काम तसेच रखडल्याची चर्चा महापालिकेत सुरू झाली.

नवीन इमारत उभारणीसाठी ११ कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. याठिकाणी चतुर्थश्रेणीच्या कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी खोल्या होत्या. आता त्यांना बसण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे मुख्य इमारतीबाहेर पदपथावर त्यांना बसावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांना पावसाळ्यातही तिथे बसण्याशिवाय पर्याय नव्हता.

Panjim  Municipal Corporation
Onam In Goa: डिचोलीत ओणम्‌ थाटात; केरळी संस्कृतीचे दर्शन

सध्याची महापालिकेची इमारतही जीर्ण झालेली आहे.शिवाय कर्मचाऱ्यांना बसण्यासाठीही या इमारतीत पुरेसी जागा नाही. कागदपत्रे ठेवण्यासाठी सुरक्षित जागेचा अभाव आहे. कार्यालयातील भिंती पाहिल्यानंतर इमारतीची दशा लक्षात येते.

‘जी-सुडा’कडून गतीने काम होईल !

नव्या इमारतीच्या पूर्ण आराखडा तयार करण्यात आला आहे आणि त्यास नगर विकास प्राधिकारणाने मंजुरी दिली आहे. गोवा राज्य नियोजन विकास प्राधिकरणाने या आराखड्याला मंजुरी दिली आहे. परंतु गोवा राज्य नगरविकास प्राधिकरणाकडून ‘पीडीए’ला जी रक्कम भरावयाची आहे, ती भरल्यानंतर हे काम मार्गी लागेल. ‘जीसुडा’तर्फेच हे काम सुरू आहे, त्यामुळे त्यांच्याकडून जेवढ्या गतीने ही कामे होतील, तेवढ्या लवकर या इमारत उभारणीच्या कामाला सुरुवात होईल, असे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com