Mormugao Municipality
Mormugao MunicipalityDainik Gomantak

Mormugao Municipality: पालिका इमारत नूतनीकरणाचा खर्च वाढला

मुरगाव पालिका बैठक : आणखी तीन ते चार कोटी पंधराव्या वित्त आयोग फंडातून देणार
Published on

Mormugao Municipality: मुरगाव पालिका मंडळाच्या बैठकीत कार्यालयीन इमारत नूतनीकरण खर्च, भटकी गुरे, भारतीय तेल महामंडळाकडे असलेली थकबाकी, भाजी मार्केट तसेच इतर ठिकाणी विक्रेत्यांनी केलेली विस्तारित बांधकामे आदी विविध विषयांवर चर्चा झाली.

Mormugao Municipality
Goa Drug Case: ड्रग्ज तस्करप्रकरणी 5 पोलिसांचे आरोप निश्‍चितीला आव्हान

पालिकेने कार्यालयीन इमारतीच्या नूतनीकरणासाठी ''सुडा''च्या खात्यामध्ये नऊ कोटी रुपये वर्ग केले होते. परंतु आता कामांच्या यादीमध्ये नसलेली कामेही करण्यात आल्याने खर्च तीन ते चार कोटींनी वाढला आहे. त्यामुळे वाढीव खर्च पंधराव्या वित्त आयोग फंडातून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी सांगितले.

जी-२० मुळे येथे भटकी गुरे पकडून गोशाळेत नेण्यात आली होती. त्यापैकी काही गुरे पुन्हा रस्त्यावर दिसू लागली आहेत. गोशाळेने या गुरांना पुन्हा पकडून न्यावीत, त्यांना बिलाची रक्कम देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

भारतीय तेल महामंडळाच्या आगारामध्ये आठ हजार चौरस मीटर्सपेक्षा अधिक जागा मोकळी आहे. त्या जागेच्या भाड्याची थकबाकी आहे. ती मिळावी यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता.

Mormugao Municipality
Onam In Goa: डिचोलीत ओणम्‌ थाटात; केरळी संस्कृतीचे दर्शन

या जागेचे भाडे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या भाडे दरानुसार आकारण्यात यावे, अशी विनंती महामंडळातर्फे करण्यात आली होती. तथापि मोकळ्या जागेसंबंधी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कोणतेही मार्गदर्शक दरपत्रक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. या थकबाकीवर तोडगा काढण्यासाठी समिती निवडण्यात आली आहे.

भाजी मार्केटमध्ये पूर्वी हातगाडे होते. त्या हातगाड्यांचे रूपांतर गाडे व पक्क्या स्वरुपातील दुकानांमध्ये करण्यात आले आहे. ज्यांनी विस्तारित कामे केली आहेत, त्यांना दंड करून ते विस्तारित बांधकाम तोडण्याचे अधिकार मुरगाव पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. संडे मार्केट नावाने ओळखले जाणाऱ्या मार्केटमध्ये काही विक्रेत्यांनी विस्तारित बांधकामे केली आहेत. ती तोडण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com