Onam In Goa: डिचोलीत ओणम्‌ थाटात; केरळी संस्कृतीचे दर्शन

‘कल्पका’तर्फे उत्सवाचे आयोजन: महाबली स्वागतासह विविध कार्यक्रमांची रेलचेल
Onam In Goa:
Onam In Goa:Dainik Gomantak
Published on
Updated on

Onam In Goa: राजा महाबलीचे स्वागत आणि अन्य पारंपरिक कार्यक्रमांसह आज (रविवारी) डिचोलीत केरळ समाज बांधवांतर्फे ‘ओणम’ उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाच्या माध्यमातून डिचोलीवासियांना केरळ संस्कृतीचे दर्शन घडले. डिचोली शहर आणि परिसरात वास्तव्य करून राहणाऱ्या केरळीय बांधवांच्या 'कल्पका कल्चरल असोसिएशन'तर्फे हा उत्सव साजरा करण्यात आला.

Onam In Goa:
Goa Drug Case: ड्रग्ज तस्करप्रकरणी 5 पोलिसांचे आरोप निश्‍चितीला आव्हान

ओणम म्हणजे केरळमधील नवीन वर्षाची सुरवात. ओणमच्या दिवशी राजा महाबली पृथ्वीवर येतात,अशी केरळी जनतेची भावना असून त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ हा उत्सव साजरा होतो. बोर्डे श्री महामाया देवस्थानात आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये,आमदार प्रेमेंद्र शेट तसेच डिचोली, साखळीचे नगराध्यक्ष अनुक्रमे कुंदन फळारी आणि रश्मी देसाई, वासू नायर, ‘कल्पका’चे अध्यक्ष जयप्रकाश, प्रसाद नायर उपस्थित होते.

‘पोकल्लम’ विजेत्यांना बक्षिसे

राजा महाबलीची वेशभूषा केलेल्या व्यक्तीसह मान्यवरांचे वाजतगाजत उत्सवस्थळी आगमन होताच आयोजकांतर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते केरळ समाजातील हुशार विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच ‘पोकल्लम’ (फुलांची रांगोळी) स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे वितरीत करण्यात आली. यावेळी केरळ संस्कृतीची ओळख करून देणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

Onam In Goa:
Girish Chodankar: तरूण तेजपाल, मिलिंद नाईक प्रकरणात तक्रारी होत्या का?

केरळ संस्कृतीचे कौतुक

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि प्रेमेंद्र शेट यांनी केरळी संस्कृतीचे कौतुक करताना गोव्याच्या आणि केरळमधील संस्कृतीमध्ये साम्य असल्याचे गौरवोद्गार काढले. गोव्याच्या विकास प्रक्रियेत केरळी बांधवांचे लक्षणीय योगदान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कुंदन फळारी, रश्मी देसाई आणि वासू नायर यांनीही मनोगत व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com