Goa Election: राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी 12 जागा लढवणार

राष्ट्रवादीने गुरुवारी 8 उमेदवारांची नावे जाहीर केली. आतापर्यंत त्यांनी एकूण 12 लोकांना उमेदवारी दिली आहे.
Shiv Sena and NCP
Shiv Sena and NCPDainik Gomantak

पणजी: आगामी गोवा विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र लढवणार आहेत. यासाठी दोन्ही पक्षांनी मिळून 24 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्ष समान जागा लढवणार आहेत. राष्ट्रवादीने गुरुवारी 8 उमेदवारांची नावे जाहीर केली. आतापर्यंत त्यांनी एकूण 12 लोकांना उमेदवारी दिली आहे. याआधी 11 उमेदवारांची नावे जाहीर करणाऱ्या शिवसेनेने कुठ्ठाळी मतदारसंघातून भक्ती खडपकर यांचे नाव जाहीर केले आहे. (NCP Shiv Sena Goa Election)

Shiv Sena and NCP
Goa: मुख्यमंत्री सावंत यांनी नजर भिडवून बोलावे: लक्ष्मीकांत पार्सेकर

धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्रित यावी अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सुरुवातीपासून घेतली आहे त्या धोरणानुसार आम्ही काँग्रेससोबत युतीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, त्याला काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. महाराष्ट्रप्रमाणे गोव्यातही (Goa) आघाडीची अपेक्षा होती. म्हणून राष्ट्रवादीने शिवसेनेबरोबर युती केली असून 12 जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे गोवा प्रभारी प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Shiv Sena and NCP
गोव्यात कोरोनाचा कहर; एका दिवसात 15 बळी तर 71 जण रुग्णालयात दाखल

यावेळी भाजपचे (BJP) माजी आमदार आणि मंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्स यांनी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रॉड्रिग्स हे वेळी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. पटेल पुढे म्हणाले राष्ट्रवादी हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. गोव्यातील जनतेने तो नेहमीच खुल्या मनाने स्वीकारला आहे. गोव्यात कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार नाही हे स्पष्ट आहे. म्हणून सत्ता स्थापनेत राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची असेल. राष्ट्रवादीने आतापर्यंत 12 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, ज्यात वेळीमधून फिलिप नेरी रॉड्रिग्स, मडकईमधून रुद्र तळावलीकर, थिविमधून गॉडफ्रे लिमा, केपेमधून अलोशन डिसिल्वा, सांगेमधून डोमिसिओ बॅरेटो, नुवे मधून मिकी पाशेको, नावेली मधून रहेना मुजावर, दाभोळी मधून जोस फिलिप डिसोझा, शिरोडा येथे डॉ सुभाष प्रभूदेसाई , प्रियोळ इथून दिग्विजय वेलिंगकर, पर्वरी येथून शंकर फडते तर सांतआंद्रे मधून इस्टवन डिसोजा अशी नावे आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com