गोव्यात कोरोनाचा कहर; एका दिवसात 15 बळी तर 71 जण रुग्णालयात दाखल

गेल्या 24 तासांत 955 नवे बाधित रुग्ण सापडले.
Goa COVID-19
Goa COVID-19Dainik Gomantak

पणजी: राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर अद्यापही कायम असून, गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे 15 बळी गेल्याची माहिती आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली. सर्वांत गंभीर बाब म्हणजे यातील 9 जणांनी कोरोना प्रतिबंधक कोणतीही लस घेतली नव्हती. तर मृत्युमुखी पडलेले चार रुग्ण हे साठ वर्षांखालील आहेत. सर्व नागरिकांनी लसीकरणाचे डोस घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी केले आहे. (Goa COVID-19 Updates)

Goa COVID-19
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी पाच दाम्पत्यांसह बापलेकही रिंगणात

गेल्या 24 तासांत 955 नवे बाधित रुग्ण सापडले. लसीकरणाचा (Vaccination) पहिला डोस 100 टक्के पूर्ण होऊनसुद्धा मृत्युसंख्येत घट झालेली नाही. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, अन्य आजारांनी त्रस्त असल्याने आणि कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर तातडीने वैद्यकीय उपचार न घेतल्यामुळे हे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. लोक घरीच चाचण्या करतात. त्याची माहिती नॅशनल पोर्टलला न भरता लपवली जाते. लोक घरीच उपाययोजना करतात. यामुळे मृत्यूंच्या प्रमाणात वाढ दिसते, असे डॉ. राजेंद्र बोरकर यांनी सांगितले. गेल्या 24 तासांत तब्बल 71 जणांना दवाखान्यात दाखल करण्यात आले.

गुरुवारी कोरोना संक्रमण दर 28.07 (पॉझिटिव्हिटी रेट) होता. कोरोनासंबंधींचे निर्बंध वाढविले आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीचा प्रचार (Election Campaign) जोमात आहे. पर्यटन आणि दैनंदिन व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज सक्रिय रुग्णांची संख्या 13 हजार 269 होती. गेल्या 24 तासांत नवे 955 बाधित रुग्ण सापडले.

13,269 सक्रिय रुग्ण

राज्यात आतापर्यंत 2 लाख 35 हजार 39 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी 2 लाख 18 हजार 125 रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.80 टक्के इतके आहे. सध्या राज्यात 13 हजार 269 रुग्ण सक्रिय असून गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 15 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूचा एकूण आकडा 3 हजार 645 झाला आहे. गेल्या 24 तासांत 71 जणांना उपचारासाठी रुग्णालयात भरती केले आहे. गुरुवारी दिवसभर 3,402 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेतल्या. त्यापैकी 955 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

Goa COVID-19
गोव्याच्या राजकारणात भंडारी समाजाचे महत्व काय?

नियम धाब्यावर

लसीकरणाचे प्रमाण 98.65 झाल्याने रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र, अनेक लोक एसओपीचे पालन करीत नाहीत. याशिवाय कोविड चाचण्यांसाठी पुढे येत नसल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती लसीकरण विभागाचे प्रमुख राजेंद्र बोरकर यांनी दिली.

3390 कोरोनामुक्त

राज्यात कोरोना (Coronavirus) बाधितांचे प्रमाण झपाट्याने वाढत असले तरी आज 3390 जण कोरोनातून मुक्त झाले, तर उपचारासाठी भरती केलेल्या 41 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com