Margao News : नौदलाचा कॅप्टन ते पर्यावरण रक्षण कार्यकर्ता

Margao News : २०१८ मध्ये नौदलातून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यानंतर गोव्यातील सामाजिक चळवळीत सक्रिय.
Captain Viriato Fernandes
Captain Viriato FernandesDainik Gomantak

Margao News :

मडगाव, आपली २६ वर्षे नौदलासाठी दिल्यानंतर स्वेच्छा निवृत्ती स्वीकारीत स्वतःला गोव्यातील पर्यावरण चळवळीत झोकून देणारे कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी एअरोनोटीक्स क्षेत्रातले एक निष्णात मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून कार्यमुद्रा उमटवली.

१९९९ मध्ये कारगिल युद्ध पेटले त्यावेळी कोब्रा स्क्वाड्रनमध्ये त्यांचा समावेश होता. पश्चिमी सीमेवर देखरेख करण्यासाठी त्यांना तैनात केले गेले.

त्यापूर्वी पोखरणमध्ये दुसऱ्या अणू बॉम्बची चाचणी झाली त्यावेळीही त्यांना ३१० स्क्वाड्रनबरोबर देखरेखीच्या मोहिमेवर पाठविले. ज्यावेळी देशात त्सुनामी आली त्यावेळी कॅ. फर्नांडिस हे पोर्ट ब्लेअरवर काम करत होते. त्यावेळी त्सुनामीच्या तडाख्यात अडकलेल्या लोकांना छोट्या विमानातून सुरक्षित ठिकाणी आणण्याचे जोखमीचे काम विरियातो यांनी केले.

१० डिसेंबर २०२१ साली प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश.

२०२२ मध्ये काँग्रेस उमेदवारीवर दाबोळी मतदारसंघातून निवडणूक लढवली.

२०१८ मध्ये नौदलातून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यानंतर गोव्यातील सामाजिक चळवळीत सक्रिय.

‘गोयचो आवाज’ या संघटनेची स्थापना. पर्यावरणीय चळवळीत झोकून दिले.

तीन रेखीय प्रकल्पांना विरोध करण्यासाठी आघाडीवर राहून आंदोलनात सहभाग. कोळसा विरोधी आंदोलनातील बिनीचे नेते.

गोव्यात होणाऱ्या सुवर्ण तस्करी प्रकरणाचा भांडाफोड, भाजप मंत्र्यांचा त्यात हात असल्याचा आरोप.

वाचन हा विरियातो यांचा आवडता छंद. स्वयंपाक करण्याचीही आवड.

लाखो रुपयांची बिदागी मिळणारी ऑफर सोडली

निवृत्तीनंतर आखाती देशात ‘प्रोजेक्ट डायरेक्टर’ म्हणून विरियातो यांनी लाखो रुपयांची बिदागी मिळणारी ऑफर सोडली. त्यांनी २०१८ मध्ये गोव्यातील ९ एनजीओ एकत्र करून 'गोयचो आवाज' या संघटनेची स्थापना केली.

तीन रेखीय प्रकल्पांना विरोध करण्यासाठी आघाडीवर राहून आंदोलनात सहभाग घेतला. कोळसाविरोधी आंदोलनातील ते बिनीचे नेते होते. पर्यावरण रक्षण चळवळीत सक्रिय असताना त्यांनी संपूर्ण गोवा पिंजून काढला. म्हादई रक्षण चळवळीतही ते सक्रिय होते.

Captain Viriato Fernandes
Goa Weather Update: गोव्यात सोमवारपासून तीन दिवस पावसाची शक्यता; तापमानाचा पारा 33.5 अंशांवर

प्रियांका गांधींंच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात :

१० डिसेंबर २०२१ साली प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश, २०२२ मध्ये काँग्रेस उमेदवारीवर दाबोळी मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला तरी त्यांनी माविन गुदिन्होंसारख्या तगड्या उमेदवाराला घाम आणला. गोव्यात होणाऱ्या सुवर्ण तस्करी प्रकरणाचा भांडाफोड, भाजप मंत्र्यांचा त्यात हात असल्याचा आरोप करून त्यांनी गोव्यात खळबळ माजवली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com