Nava Somvar Utsav: नव्या सोमवारानिमित्त डिचोली भक्तीमय; शांतादुर्गेच्या भाविकांची तुडुंब गर्दी

Nava Somvar Utsav Bicholim: कडो वर्षांची परंपरा असलेला डिचोली येथील प्रसिद्ध ‘नवा सोमवार उत्सव’ (ता. ९) साजरा होत असून हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी डिचोलीनगरी सज्ज झाली आहे.
Nava Somvar Utsav Bicholim
Nava Somvar Utsav BicholimX
Published on
Updated on

डिचोली: शेकडो वर्षांची परंपरा असलेला डिचोली येथील प्रसिद्ध ‘नवा सोमवार उत्सव’ उद्या (ता. ९) साजरा होत असून हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी डिचोलीनगरी सज्ज झाली आहे. डिचोली नगरवासीयांसह देवीच्या भक्तगणांचा आनंद द्विगुणित करणारा असा हा उत्सव आणि संपूर्ण गोवा तसेच राज्याबाहेर प्रसिद्धीस पावलेला आहे. नवा सोमवार उत्सवानिमित्त शहरात मंगल आणि भक्तीमय वातावरण पसरले आहे.

मंदिरांसह घरोघरी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या उत्सवानिमित्त यंदाही नामवंत गायकांच्या गायन मैफलींचे आयोजन करण्यात आले असून रात्रभर शहरात स्वरधारांची बरसात होणार आहे. हा उत्सव निर्विघ्नपणे साजरा होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. गावकरवाडा येथील श्री शांतादुर्गा देवस्थान ग्रामस्थ गावकर मंडळातर्फे तर आतीलपेठ येथील मठ मंदिरात गुरुफंड ट्रस्ट आणि भायलीपेठ बाजारकर दहाजण मंडळातर्फे हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

गावकरवाडा शांतादुर्गा देवस्थान

गावकरवाडा येथील श्री शांतादुर्गा मंदिरात सकाळपासून महाभिषेक, लघुरुद्र, आरती आणि तीर्थप्रसाद होणार आहे. रात्री उशिरापर्यंत भाविकांना देवीच्या चरणी भक्तीरूपाने सेवा करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. रात्री ९ वा. श्री शांतादुर्गा देवीला गाऱ्हाणे घातल्यानंतर दिंडी आणि बँडवादन तसेच फटाक्यांच्या आतषबाजीसह देवीच्या जयघोषात पालखी मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. मंगळवारी पहाटे पालखीचे मंदिरात आगमन झाल्यानंतर आरती, तीर्थप्रसाद आणि गाऱ्हाणे होऊन या उत्सवाची सांगता होणार आहे.

Nava Somvar Utsav Bicholim
Goa Politics: काँग्रेसमधील काही नेत्यांना ‘इंडिया’ आघाडी नकोय! अमित पालेकरांचे खळबळजनक विधान

मठ मंदिरात उत्सव

आतीलपेठ येथील श्री शांतादुर्गा मठ मंदिरात गुरुफंड ट्रस्ट आणि भायलीपेठ बाजारकर दहाजण मंडळ उत्सव समितीतर्फे नवा सोमवार साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळपासून मठ मंदिरात विविध धार्मिक विधी होणार आहेत. रात्री परंपरेप्रमाणे पालखी मिरवणूक होणार आहे. रात्री १० वा. श्री शांतादुर्गा मठ मंदिरात मुंबई येथील गायक ओंकार प्रभू घाटे आणि सौ. सुस्मिरता डवाळकर यांची गायनाची मैफल होणार आहे. त्यांना महेश धामस्कर (संवादिनी), राया कोरगावकर (ऑर्गन), दयानिधेश कोसंबे (तबला), दत्तराज शेट्ये (पखवाज), राहुल खांडोळकर (मंजिरी) हे कलाकार साथसंगत करणार आहेत. मध्यरात्री १२ वा. भायलीपेठ येथील गुरुफंड ट्रस्ट सभागृहात गायनाची दुसरी मैफल होणार आहे. यात सौ. धनश्री गाडगीळ (फडके) आणि दत्तगुरू केळकर हे कलाकार गायन सादर करणार आहेत. त्यांना गोपाळ प्रभू (संवादिनी), मिलिंद परब (तबला), केदार धामस्कर (पखवाज) आणि सूर्या शिरोडकर (मंजिरी) हे कलाकार साथसंगत करणार आहेत.

Nava Somvar Utsav Bicholim
Tiger Attack: ..अचानक समोर आला वाघ! हल्ला करणार इतक्यात; चोर्ला घाटातील थरारक प्रसंग वाचा

मैफलींचे आयोजन

रात्री १० वा. श्री शांतादुर्गा देवीच्या प्रांगणात समृद्ध चोडणकर निर्मित ‘ॐकार स्वरूपा’ हा कार्यक्रम होईल. या मैफलीत इंडियन आयडॉल अभिषेक तेलंग (मुंबई) आणि ‘सूर नवा, ध्यास नवा’ फेम सौ. संज्योती जगदाळे (मुंबई) हे कलाकार भाग घेणार आहेत. सौ. अनुश्री फडणीस देशपांडे निवेदन करणार आहेत. मध्यरात्री दीड वाजता श्री रवळनाथ देवाच्या प्रांगणात ‘अवघे गरजे पंढरपूर’ हा नाट्य, भक्ती आणि अभंग गायनाचा कार्यक्रम होणार आहे. या मैफलीत गायक अभिषेक काळे (पुणे) आणि सौ. भाग्यश्री आठले जोशी (देवगड) हे कलाकार गायन सादर करणार आहेत. परेश नाईक हे निवेदक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com