Goa Job Fair: गोव्यात 08 नोव्हेंबरला मेगा जॉब फेअर; विविध क्षेत्रात हजारो संधी

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तीनशेहून अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत.
Goa Job Fair
Goa Job FairDainik Gomantak

गोवा सरकारने येत्या 08 नोव्हेंबरला मेगा जॉब फेअर (Goa Mega Job Fair) आयोजित केले आहे. यामध्ये गोव्यातील तरूण-तरूणींना विविध क्षेत्रात कामाची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तीनशेहून अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत. गोमंतकीय युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

Goa Job Fair
Sindhudurg: भ्रष्टाचारावर मात करण्यासाठी फक्त एक फोन, 6 नोव्हेंबरपर्यंत दक्षता जनजागृती सप्ताह

कामगार आणि रोजगार विभागामार्फत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मैदान, तालेगाव येथे हा जॉब फेअर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. उमेदवारांना या जॉब फेअरमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी हा उपक्रम महत्वाचा असून, अनेकांना त्यांचा फायदा होईल. या नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रात इच्छुक उमेदवारांना संधी मिळेल. असे कामगार मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी म्हटले आहे.

Scan This OR Code
Scan This OR Code Dainik Gomantak
Goa Job Fair
UK News: डर्टी कॉप! ऑन ड्युटी असताना पोलीस महिलेने शूट केला स्वत:चा अश्लील व्हिडीओ

यावर्षी ऑगस्ट महिन्यात गोव्याचा बेरोजगारीचा दर 13.7 टक्के होता, त्याचवेळी देशाचा सरासरी दर 07 टक्के होता. पदवी घेणाऱ्या तसेच, पीजी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात दरवर्षी पुरेशा नोकरीच्या संधी निर्माण होत नाहीत. गोव्यात आयोजित भव्य नोकरी मेळावा अनेकांना नोकरीच्या संधी मिळवून देईल. नोकरी मेळाव्यासाठी आयटी, फार्मा, पर्यटन, हॉस्पिटॅलिटी, लॉजिस्टिक, ऑटोमोबाईल, आरोग्य, उत्पादन आणि विक्री क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, असे मोन्सेरात यांनी म्हटले आहे.

Goa Job Fair
LIC's Dhan Varsha: रिस्क कव्हर आणि बचतही; एलआयसीची नवी पॉलिसी आहे खास

अशी करा नोंदणी

नोकरी मेळाव्यात सामिल होण्यासाठी उमेदवारांना पूर्वनोंदणी करणे बंधनकारक आहे. यासाठी www.goajobfair.in या लिंकवर नोंदणी करता येईल. नोंदणीनंतर उमेदवारांनी एक क्युआर कोड मिळणार आहे, जो नोकरी मेळाव्याच्या ठिकाणी उमेदवारांना दाखवणे बंधनकारक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com