Sindhudurg News: लाच देणे आणि लाच घेणे हे दोन्ही कायद्याने गुन्हा आहे. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रासाठी (Corruption Free Maharashtra) सिंधुदुर्ग लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे 31 ऑक्टोबर पासून 6 नोव्हेंबरपर्यंत दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित केला आहे. कोणताही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी शासकीय कामासाठी लागणाऱ्या शुल्काव्यतिरिक्त पैशाची, वस्तूची मागणी करत असेल तर ती लाच असून, त्याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.
शासकीय अधिकारी, कर्मचारी कोणत्याही प्रकारे लाचेची मागणी करीत असेल तर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग कार्यालय कुडाळ 1064 या टोल फ्री क्रमांकावर, 02362-222289 वर तसेच 9930997700 या व्हाट्स ॲप (WhatsApp) क्रमांकावर, पोलीस उपअधीक्षक दीपक कांबळे -9890079208, www.acbmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर लेखी तक्रार करा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दीपक कांबळे यांनी केले आहे.
शासकीय नोकरांनी लाचेची मागणी, लाच स्वीकारणे, शासकीय नोकरास लाच देणे, अपसंपदा प्राप्त करणे व पदाचा दुरूपयोग करून भ्रष्टाचार करणे, शासकीय नोकराने भ्रष्टाचारामार्फत मोठ्या प्रमाणात स्वत:च्या नावे किंवा त्याच्यावतीने कोणत्याही व्यक्तीकडे, पद धारण करण्याच्या कालावधीत कोणत्याही वेळी तो समाधानकारक हिशोब देवू शकणार नाही अशा आर्थिक साधन-संपत्तीचा किंवा त्याच्या प्राप्तीच्या ज्ञात साधनांचा विसंगत प्रमाणात मालमत्ता जमवणे. अशा गुन्ह्याचा तपास एसीबीमार्फत होतो. लोकसेवक किंवा खासगी इसम. जो लोकसेवकाच्यावतीने लाचेची मागणी करेल व स्वीकारेल. ज्या लोकसेवकाकडे तक्रारदाराचे कायदेशीर काम प्रलंबित आहे अशा लोकसेवकाविरुध्द तसेच त्याच्याकडे काम प्रलंबित नसतानाही स्वत:च्या फायद्यासाठी पदाचा दुरूपयोग करणाऱ्या लोकसेवकाविरूध्द तक्रार देता येते.
लोकसेवकाने घटनास्थळीच लाचेची मागणी केली किंवा लाच स्वीकारली अशा वेळी अशा लाचेच्या घटनांच्या माहितीबाबत मोबाईल, कॅमेरामध्ये, ऑडीओ-व्हिडीओ टिपून तो एसीबीच्या www.acbmaharashtra.net या मोबाईल ॲपवरील कंप्लेंट पॅनलमधून पोस्ट करावी.
लाच घेणाऱ्या लोकसेवकांची तक्रार आणि संपवूया भ्रष्टाचार. त्यासाठी लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग, पोलीस उपअधीक्षक दीपक कांबळे टोल फ्री क्रमांक 1064, 02362-222289, पोलीस उपअधीक्षक दीपक कांबळे-9890079208, पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील- 8369960851, पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला- 8805267878 तसेच 9930997700 या व्हाटस ॲप क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी, प्रशांत सातपुते यांनी केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.