UK News: डर्टी कॉप! ऑन ड्युटी असताना पोलीस महिलेने शूट केला स्वत:चा अश्लील व्हिडीओ

पोलीस महिलेने एकच व्हिडीओ अश्लिल असल्याचे म्हटले असून, इतर नाहीत असे स्पष्टीकरण दिले आहे.
UK News
UK NewsDainik Gomantak
Published on
Updated on

ब्रिटनमधील (Britain) एका पोलीस ठाण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस महिलेने ऑन ड्युटी असताना चक्क स्वत:चा अश्लिल व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट केला. आणि तो व्हिडिओ आपल्या पार्टनर सोबत शेअर केला. एवढेच नव्हे तर, महिला पोलीस, पोलीस ठाण्यातील गोपनीय माहिती देखील तपासत होती व जोक म्हणून आपल्या सहकाऱ्यांशी शेअर करत असल्याची माहिती तपासातून समोर आली.

क्लेअर ओग्डेन (वय 40) (Clare Ogden) असे या महिला पोलीसाचे नाव आहे. महिला रेडकार पोलीस (Redcar Police Station) ठाण्यात कामाला होत्या, पोलीस गणवेशात असताना त्यांनी स्वत:चा अश्लिल व्हिडीओ चित्रित केला. ओग्डेन लंच ब्रेकनिमित्त बाहेर असताना पोलीस ठाण्याच्या स्वच्छतागृहात हा व्हिडीओ त्यांनी मोबाईलमध्ये चित्रित केला. एवढेच नव्हे तर हा व्हिडीओ त्यांनी आपल्या जोडीदारासोबत शेअर केला. दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वत्र या विषयाची चर्चा सुरू आहे.

UK News
Sindhudurg: भ्रष्टाचारावर मात करण्यासाठी फक्त एक फोन, 6 नोव्हेंबरपर्यंत दक्षता जनजागृती सप्ताह

घडले असे की, महिला पोलीस, पोलीस ठाण्यातील गोपनीय माहिती तपासत असताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला आढळून आली. महिलेचा मोबाईल फोन तपासण्यात आला त्यावेळी तिने ही माहिती जोक म्हणून आपल्या सहकाऱ्यांसोबत शेअर करत असल्याचे दिसून आले. तसेच, महिलेच्या मोबाईलमध्ये तीन अक्षेपार्ह व्हिडीओ आढळून आले. तिन्ही व्हिडीओ महिलेने स्वत:चे अश्लिल व्हिडीओ आढळून आल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पण, पोलीस महिलेने एकच व्हिडीओ अश्लिल असल्याचे म्हटले असून, इतर नाहीत असे स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान, तपासात महिलेच्या मोबाईलमध्ये अनेक गोपनीय फोटो सापडले. हे फोटो महिलेने पोलीस ठाण्यातूनच घेतल्याचे निष्पण्ण झाले. तीन अश्लिल व्हिडीओबाबत बोलताना महिलेने लंच ब्रेकमध्ये हा व्हिडिओ शुट केला आणि त्यावेळी मी ड्युटीवर नव्हते असे तिने सांगितले. तसेच, तीनपैकी एकच अश्लिल असल्याचे महिलेने मान्य केले. न्यायालयात सुनावणी दरम्यान कोर्टाने महिलेला फटकारले असून, तुम्ही जेव्हा ड्युटीवर असता तेव्हा पूर्णपणे ड्युटीवरच असता. याची आठवण करून दिली आहे. दरम्यान, जूनमध्ये महिलेला ड्युटीवर असभ्य वर्तन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com