National Highway: राष्ट्रीय महामार्गाचे ‘भिजत घोंगडे’

रेल्वे वा रस्ता यांमुळे विकासाची द्वारे खुली होतात, हे विरोध करणाऱ्यांना पटवून देण्याऐवजी त्यांना फूस लावण्याकडेच बहुतेक राजकारण्यांचा कल असतो.
 National Highways
National HighwaysDainik Gomantak
Published on
Updated on

National Highway: मुंबई ते मंगळुरू या राष्ट्रीय महामार्गाचे काम गोव्याचा अपवाद वगळता बहुतेक ठिकाणी पूर्ण झालेले आहे. गोव्यातील काम अपूर्ण राहाण्यास स्थानिक सरकारचा नाकर्तेपणा आणि लोकांचा आंधळा विरोध, हे कारणीभूत आहे.

रेल्वे वा रस्ता यांमुळे विकासाची द्वारे खुली होतात, हे विरोध करणाऱ्यांना पटवून देण्याऐवजी त्यांना फूस लावण्याकडेच बहुतेक राजकारण्यांचा कल असतो. त्यामुळे ही विकास कामे रखडली तर आहेतच;

पण त्यातून जागोजागी मृत्यूचे सापळे तयार झाले आहेत, हे या नेत्यांना आणि विरोध करणाऱ्यांना कोण पटवून सांगणार, अशी विचारणा आता होऊ लागली आहे.

चावडीतले वराहपुराण

दशावतार आरतीमध्ये वराहाचे महत्त्व सांगितले आहे. पृथ्वी जेव्हा संकटात सापडली होती, देवाने वराह रूप घेऊन पृथ्वीला संकट मुक्त केले. गेल्या आठवड्यात सात रानडुकरे (वराह) चावडी येथील भर बाजारात घुसली. इतकेच नव्हे, तर त्यांनी बाजारात घुसताना काही दुचाकी धडक देऊन खाली पाडल्या.

मग संतापलेल्या काहीजणांनी या वराहांना ‘खेती’ म्हणण्यासही मागे-पुढे पाहिले नाही. मात्र, ही रानडुकरे भरगच्च बाजारात घुसली कशी, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. कारण बाजाराच्या एक बाजूला उंच डोंगर आहे

. दुसऱ्या बाजूला शेतजमीन आहे. या दोन्ही ठिकाणी सध्या अमर्याद मानवी हस्तक्षेप सुरू आहे. त्यामुळे त्यांना ‘सळो की पळो’ केले असावे किंवा त्यांची वेळ चुकली असावी, त्यामुळे ते दिवसाढवळ्या बाजारात घुसले असावेत, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

 National Highways
Green School: देशातील पहिली ग्रीन शाळा गोव्यात सुरू

दामू, इकडेही लक्ष द्या ना!

दामोदर शिरोडकर यांनी मडगाव नगराध्यक्ष पदाची धुरा स्वीकारल्यानंतर थकबाकी वसुलीवर भर देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पाच ते सहा महिन्यांत त्यांनी साधारण एक कोटीपर्यंत थकबाकी वसूल केली आहे.

अर्थात, पालिकेच्या कर तसेच वसुली विभागाचा त्यात हातभारही आहेच. पण मुद्दा तो नाही, तर पालिका कक्षेत शेकडो नव्हे तर हजारावर आस्थापने अद्याप ट्रेड परवान्याविना आहेत. त्यातील अनेकांनी या परवान्यासाठी अर्जही केले आहेत; पण पालिकेतील संबंधित कर्मचारी वेगवेगळ्या सबबी पुढे करून टोलवाटोलवी करत असल्याच्या तक्रारी आहेत.

ही प्रकरणे प्राधान्यक्रमाने हातावेगळी केली तर भरीव निधी पालिकेच्या खजिन्यात येऊ शकेल, असे व्यापारीच सांगताना आढळतात. नगराध्यक्षांनाच आता यात लक्ष घालावे लागेल, असे दिसते.

 National Highways
Fire In Goa: उसगाव येथील फॅन्सी स्टील इंडस्ट्रीजला भीषण आग, लाखांचे नुकसान

‘देवाकडेही राजकारण?’

सध्या केपे मतदारसंघात नेमके काय सुरू आहे, त्याचा थांगपत्ता कुणालाच लागत नाही. बाबू आणि एल्टन यांच्या राजकारणात सामान्य लोक मात्र भरडून जात आहेत, असे एकंदर चित्र दिसून येत आहे. उदाहरण द्यायचेच झाल्यास काल मोरपिर्ला येथे झालेल्या सप्तकोटेश्वर देवस्थानच्या वर्धापनदिन कार्यक्रमाचे देता येईल.

आयोजकांनी या कार्यक्रमासाठी समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार एल्टन डिकॉस्ता आणि माजी आमदार बाबू कवळेकर या तिघांनाही आमंत्रित केले होते. परंतु सुभाष आणि एल्टन असल्यामुळे असेल कदाचित बाबू त्या कार्यक्रमाला आलेच नाहीत.

मात्र, काही वेळानंतर बाबू कवळेकर यांच्या काही कार्यकर्त्यांनी आणखी एक कार्यक्रम आयोजित करून बाबूंना स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. हे करताना सुरू असलेले नाटकही बंद करून या कार्यक्रमाचे आयोजन केले. एकाच उत्सवात झालेल्या दोन कार्यक्रमांची चर्चा या भागात बरीच गाजत आहे. ‘देवाकडेही राजकारण?’ असा सवाल लोक करत आहेत.

 National Highways
Goa News:...यामुळे नव्या आयकर प्रणालीचा राज्याला दुप्पट लाभ

दीपकभाऊंची ‘एन्ट्री’

सावर्डेचे माजी आमदार तथा मंत्री दीपक पाऊसकर हे विधानसभा निवडणुकीनंतर जणू काही अदृश्‍यच झाले होते. मात्र, त्यांनी पुन्हा एकदा नव्या दमाने सामाजिक कार्यात एन्ट्री घेतली आहे. अधूनमधून उदघाटन आदी कार्यक्रमांत दीपकभाऊ दिसू लागले आहेत. दीपक पाऊसकर हे तसे चांगले व्यक्तिमत्त्व.

आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातही त्यांनी चांगली धडाडीची कामे केली; पण मतदारांनीच त्यांना साथ दिली नाही, असे त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. निवडणुकीच्या वेळीही दीपकभाऊंचा चांगलाच बोलबाला होता; पण काय झाले कोणास ठाऊक आणि हाता-तोंडाशी आलेला घास निसटला.

तरीही दीपकभाऊंनी हार मानलेली दिसत नाही. त्यामुळेच ते पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले आहेत. मात्र, त्यांची नवी रणनीती काय असेल, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com