Mumbai-Goa RoRo Service: मुंबई-गोवा महामार्ग रखडलेला, पण लवकरच सुरू होणार जलमार्ग वाहतूक: परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

RoRo Service: मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम कधी पूर्ण होणार, हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून अनुत्तरित राहिला आहे.
Mumbai-Goa RoRo Service
Mumbai-Goa RoRo ServiceDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम कधी पूर्ण होणार, हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून अनुत्तरित राहिला आहे. यामुळे प्रवाशांना आणि वाहनचालकांना दररोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. खराब रस्ते, कामांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि सततचा प्रवासाचा त्रास, हे सध्या मुंबई-गोवा मार्गाचे वास्तव आहे.

अशा स्थितीत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबई ते गोवा दरम्यान लवकरच जलमार्ग वाहतुकीची सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, “मुंबई ते गोवा रो-रो सेवा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या सेवेमुळे प्रवाशांना आणि पर्यटकांना एक नवा, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय मिळणार आहे.

रो-रो सेवेमुळे होणार बदल?

मुंबईहून सध्या अलिबागसाठी चालू असलेल्या रो-रो सेवेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या सेवेमध्ये बोटीच्या माध्यमातून प्रवासी आणि त्यांच्या वाहनांचा प्रवास शक्य होतो. त्यामुळे वेळेची बचत तर होतेच, शिवाय प्रवासही आरामदायक होतो. हीच संकल्पना आता मुंबई ते गोवा मार्गासाठीही राबवण्यात येणार आहे.

Mumbai-Goa RoRo Service
Goa Politics: विधानसभा निवडणुकीसाठी गुप्त भेटीगाठी वाढल्या! जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून 'तिसऱ्या आघाडीच्या' हालचाली?

या नवीन रो-रो सेवेचा लाभ केवळ मुंबईकरांनाच नव्हे, तर गोव्याच्या पर्यटन क्षेत्रालाही होणार आहे. विमानप्रवासाचे वाढते दर आणि रेल्वेची मर्यादित सेवा पाहता, जलमार्ग हा एक परवडणारा आणि वेगळा पर्याय ठरू शकतो. विशेषतः पर्यटन हंगामात ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.

महामार्गाचं काय?

मुंबई-गोवा महामार्गाचं काम अनेक वर्षांपासून सुरू आहे, मात्र अद्याप ते पूर्ण झालेलं नाही. वाहतुकीसाठी हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा असून, त्यावर होणाऱ्या कामांमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या पार्श्वभूमीवर जलवाहतुकीचा पर्याय उभा करणं ही शासनाची सकारात्मक पावलं मानली जात आहे.

Mumbai-Goa RoRo Service
BJP Goa: "देशाला सुराज्य श्रीरामांनी दिले तर रामराज्य पंतप्रधान मोदींनी" भाजपच्या स्थापने दिवशी मुख्यमंत्र्यांनी मानले पक्षाचे आभार

पर्यटनालाही बूस्ट

गोवा हे देशातील प्रमुख पर्यटन स्थळ असून, वर्षभर देशविदेशातील पर्यटकांची वर्दळ येथे असते. जर रो-रो सेवा मुंबईहून थेट गोव्यापर्यंत सुरू झाली, तर गोवा पर्यटनाला मोठा चालना मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः वीकेंड ट्रिपसाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी ही सेवा एक आकर्षक पर्याय ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com