कर्तव्य समजून घरात मराठी-कोकणीत बोला! अभिनेत्री मृणाल कुलकर्णींचे आवाहन; ‘मुले वाचतच नाहीत’ म्हणण्याचे फॅड आल्याचा केला दावा

Mrinal Kulkarni Goa Book Festival: आपल्या भाषेतील पुस्तके मुलांसोबत वाचा आणि त्यांच्याकडून वाचून घ्या, असे आवाहन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी केले.
Mrinal Kulkarni, Goa Book Festival
Mrinal Kulkarni, Goa Book FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोमंतकीय नागरिक अतिशय भाग्यवान आहेत; कारण त्यांच्याकडे मराठी आणि कोकणी अशा दोन भाषा आहेत; परंतु आजकाल लोक घरातही मुलांसोबत इंग्रजीतून बोलतात. आपण मातृभाषेत मुलांसोबत बोललो नाही तर भाषा संपतील. आपली अस्मिता टिकविण्यासाठी कर्तव्य समजून घरात मराठी-कोकणीत बोला. आपल्या भाषेतील पुस्तके मुलांसोबत वाचा आणि त्यांच्याकडून वाचून घ्या, असे आवाहन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी केले.

गोवा पुस्तक महोत्सवात त्या बोलत होत्या. संजय चकाणे यांनी त्यांची मुलाखत घेतली. कुलकर्णी म्हणाल्या, की गोवा आणि पुणे पुस्तक महोत्सवास मुलांचा लाभलेला प्रतिसाद मी पाहिला आहे. या महोत्सवांमध्ये तरुणाई अधिक आहे. परंतु सध्या ‘आजची मुलं वाचत नाहीत’ असे म्हणण्याचे फॅड आले आहे.

खरे तर मुलांना काय वाचावं, याचे मार्गदर्शन करण्याची गरज आहे. जर घरात आई-वडीलच मोबाईलवर असतील आणि मुलांनी वाचावं, असे त्यांना वाटत असेल तर कसे होईल? मी आणि माझे पती जेथे जातो, तेथून मुलांना आवडतील अशी पुस्तके घेऊन येतो. पहिल्यांदा त्यांच्यासमोर आम्ही पुस्तके वाचायचो.

परिणामस्वरूप आता मुलांना पुस्तकांची गोडी लागली आहे. केवळ शिक्षकांना दोष देऊन चालणार नाही. मुलांमध्ये वाचनाची गोडी रूजविण्यात पालकांची महत्त्वाची भूमिका हवी, असे त्यांनी सांगितले.

Mrinal Kulkarni, Goa Book Festival
Konkani Drama Competition: 'हा कोकणी लेखकांचा अनादर, नाट्य चळवळीला मारक'; राज्यनाट्य स्पर्धा आणि वादांचे साद-पडसाद

‘कोकणी पाककृती’ पुस्तक भावले

मुलांनी नेमकी कोणती पुस्तके वाचावीत, याबाबत राष्ट्रीय पुस्तक न्यासाने मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. गोवा पुस्तक महोत्सवात विविधांगी पुस्तके देशभरातून दाखल झाली आहेत. या महोत्सवात मराठी, कोकणी व इतर भाषांमधील अनेक पुस्तके असून येथून जाण्यापूर्वी मी कोकणी पाककृतीचे पुस्तक घेऊन जाणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

Mrinal Kulkarni, Goa Book Festival
Konkani Word Etymology: ‘बाप’ हा शब्द सध्याच्या कुंळबी भाषेतील ‘आब’ या ‘वडील’ अर्थाच्या शब्दाचे रूप; कोकणी शब्दांचे कुरुंब मूळ

‘सोनपरी’मुळे जगभरात ओळख

‘सोनपरी’ मालिकेने मला जगभरात ओळख दिली. विशेष म्हणजे, या मालिकेचे सर्वाधिक चाहते पाकिस्तानात होते. भारतीयांनीही मला भरभरून प्रेम दिले. सलग ७ वर्षे ही मालिका कायम राहिली. परंतु आतापर्यंत मला ज्या काही भूमिका मिळाल्या, त्यात सर्वाधिक भूमिका या साहित्य आधारित होत्या. त्यालाही चाहत्यांचा प्रतिसाद लाभला, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com