Konkani Word Etymology: ‘बाप’ हा शब्द सध्याच्या कुंळबी भाषेतील ‘आब’ या ‘वडील’ अर्थाच्या शब्दाचे रूप; कोकणी शब्दांचे कुरुंब मूळ

Language Origins: आपल्याला लक्ष वेधून घेणारा मुद्दा असा की कोकणी भाषेत झाडाच्या ताज्या कोंबासाठी ‘पालवी’ हा शब्द आहे, आणि कोंबांच्या एकत्रित अवस्थेस ‘पालव’ म्हणतात.
Kurumba language origins | Konkani word etymology | Pallava dynasty history
Kurumba language origins | Konkani word etymology | Pallava dynasty historyDainik Gomantak
Published on
Updated on

तेनसिंग रोद्गीगिश

पल्लवींच्या कुरुंबर भाषेत आणि तोंडै या तामीळ शब्दाचा अर्थ ताजा फुटलेला कोंब असा होतो. हा शब्द विशिष्ट कुरुंबर कुळाशी / गटाशी किंवा एकूणच कुरुंबरांशी का जोडला गेला आहे, हे आपल्याला ठाऊक नाही. तो त्यांच्या कुळाचा वृक्ष किंवा प्रतीक असू शकतो.

सिरकर एक गोष्ट सूचित करतात, जेव्हा ते म्हणतात की पल्लव हे नाव कदंबांप्रमाणे टोटेमिस्टिक उगमाचे दिसते. (संदर्भ : सिरकर, १९५४ : जीनियॉलॉजी ऍण्ड क्रॉनॉलॉजी ऑफ द पल्लवाज, मजुमदार, द हिस्टरी ऍण्ड कल्चर ऑफ द इंडियन पीपल - द क्लासिकल एज, पृ. २७५)

परंतु आपल्याला लक्ष वेधून घेणारा मुद्दा असा की कोकणी भाषेत झाडाच्या ताज्या कोंबासाठी ‘पालवी’ हा शब्द आहे, आणि कोंबांच्या एकत्रित अवस्थेस ‘पालव’ म्हणतात. आंब्याला पालवी फुटली आहे, असे म्हणायला आपण कोकणीत ‘आमो पालेला’.

संस्कृतमध्ये ताज्या फुटलेल्या कोंबाला ‘अंकुर’ म्हणतात; त्यामुळे ‘पालवी’ हा शब्द स्पष्टपणे संस्कृत / इंडो-आर्यन मूळ असलेला नाही. येथे पुन्हा एकदा कोकणीतील शब्दाला कुरुंबर मूळ असल्याचा पुरावा दिसतो; जसे ‘आव्वो’पासून कोकणीत ‘आवय’(आई) हा शब्द आल्याचे आपण आधी पाहिले आहे.

अशा प्रकारचे कोकणीतील अनेक शब्द बृहतकोकण आणि संपूर्ण द्वीपकल्पभर मूळचे कुरुंबर असल्याचे दिसतात. पल्लव वंशातील दुसरे ज्ञात राजे शिवस्कंदवर्मन यांनी त्यांच्या शिलालेखांत पहिल्या राजाचा उल्लेख ‘बाप्पा देव’ असा केला आहे.

(संदर्भ : गोपालन, १९२८ : हिस्टरी ऑफ द पल्लवाज ऑफ कांची, पृ. ३३) सिरकर यांचे मत आहे की ‘बाप्पा’ हे नाव असे न धरता, तो ‘वडील’ या अर्थाने वापरलेला स्थानिक शब्द मानला पाहिजे, कारण अनेक राजकीय सनदांमध्ये हा शब्द वडील या अर्थानेच वापरलेला आहे आणि कारण तो नंतरच्या काळातील पल्लव वंशावळीतील नावांशी अजिबात मिळताजुळता नाही.

(संदर्भ : सिरकर, १९५४ : जीनियॉलॉजी ऍण्ड क्रॉनॉलॉजी ऑफ द पल्लवाज, मजुमदार, द हिस्टरी ऍण्ड कल्चर ऑफ द इंडियन पीपल - द क्लासिकल एज, पृ. २७६)

‘बाप्पा’ हा शब्द आजही कोकणीत वडीलधाऱ्या व्यक्तींसाठी वापरला जातो; तर समकालीन मराठीत ‘बाप’, आणि कोकणीत ‘बापुय’. हे शब्दही इंडो-आर्यन मूळाचे नाहीत; संस्कृतमध्ये वडिलांसाठीचा शब्द ‘पितृ’, तर लॅटिनमध्ये रिींशी’ आहे. ‘जनक’ या संस्कृत शब्दाचा लॅटिन अनुरूप सशपळींेी’. त्यामुळे बाप / बापुय हे शब्द इंडो-आर्यन मूळ असलेले नाहीत.

‘बाप’ हा शब्द सध्याच्या कुंळबी भाषेतील ‘आब’ या ‘वडील’ अर्थाच्या शब्दाचे रूप मानता येईल. हा कोकणीतील शब्दांचे मूळ कुरुंबर असल्याचा आणखी एक पुरावा.

आपण ज्या कुरुंबर भाषेबद्दल बोलत आहोत ती सामान्य युगाच्या पहिल्या शतकांत तोंडैमंडलममध्ये प्रचलित होती. आणि तोंडैमंडलम भारताच्या पूर्व किनाऱ्यावर होते. ही भाषा, स्थानिक वैविध्यासह, तमिळ भूभागाच्या उत्तरेस संपूर्ण द्वीपकल्पभर वापरली जात असण्याची शक्यता आहे. आपण ती वडूकू भाषा विंध्याच्या दक्षिणेस आणि तमिळाकमच्या उत्तरेस असलेल्या वडुकरांची भाषा-अशीही संबोधली आहे.

आता आपण आणखी एका शब्दाकडे पाहू: राय किंवा राया हा आधुनिक कोकणीतील राजा या शब्दाचे प्राकृत स्वरूप आहे. ‘राय’ किंवा ‘राया’ हा शब्द सोळाव्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणात वापरला जात होता.

इ.स.पूर्व १ले शतक ते इ.स. ३रे शतक या कालातील कनगरहळ्ळी येथील बौद्ध स्तूपावरील शिलालेखात याच शब्दांचा उपयोग झाल्याचे आढळते. येथे अशोक, त्यांची राणी आणि चवऱ्या ढाळणारे दोन सेवक यांचे शिल्प आहे.

त्यावर सातवाहनकालीन ब्राह्मी लिपीत ‘रायो असोको’ असा मजकूर कोरलेला आहे. ‘रायो’ हा शब्द नेमका रायो असा उच्चारायचा की ‘राय’ असा, हे निश्चित नाही; पण असोको’ हा शब्द ‘असोक’ असा उच्चारित होत असावा असे मानल्यास, ‘रायो’ हा शब्द ‘राय’च असल्याचे आपल्या लक्षांत येते.

‘रायर’ हा शब्द मॅकेन्झी हस्तलिखितांत वारंवार आढळतो. तामिळ ताडपत्री हस्तलिखित क्र. २१७, काउंटर मार्क ७४, कोंगदेश राजाकळमध्ये ‘रायर्स ऑफ बिसनगऱ’ असा उल्लेख आहे; बहुधा याचा अर्थ विजयनगरच्या राजांकडे निर्देश करणारा असावा. (संदर्भ : टेलर, १८३८ : एग्झामिनेशन ऍण्ड ऍनालिसिस ऑफ द मॅकेन्झी मॅन्युस्क्रिप्ट्स डिपॉझिटेड इन द मद्रास कॉलेज लायब्ररी, खंड १)

हा संदर्भ कोंग देशम् किंवा कोंगूनाडूच्या इतिहासाशी संबंधित आहे. हा प्रदेश तामिळनाडूतील पश्चिम भाग (सेलम, कोयंबटूर) आणि मैसूर यांचा समावेश करणारा होता आणि पालक्कड घाटाच्या पूर्व प्रवेशद्वारासारखा होता. प्राचीन तमिळाकमात तो चेऱ्यांचा मुख्य प्रदेश होता; पूर्वेस तोंडैमंडलम, आग्नेयेस चोलमंडलम आणि दक्षिणेस पांड्यनाडू.

Kurumba language origins | Konkani word etymology | Pallava dynasty history
Komanda Kurumba Prabhu: महाप्रलयानंतर देश एक विशाल अरण्य होता, जिथे जंगली प्राणी होते, मानववंश उदयास आला; संघटित, सभ्य 'कुरुंब'

‘रायर्स’ हा शब्द संदर्भावरून पाहता ‘राजे’ या अर्थाने वापरलेला दिसतो. ‘रायर’ हा ‘राय’चा अँग्लिसाईज्ड प्रकार असावा. कोकणीत ‘राय’ हा शब्द एकवचनी आणि बहुवचनी अशा दोन्ही अर्थाने वापरला जातो.

विल्सन यांनी कोंगदेश राजाकळ विषयी लिहिताना कोंगा / चेऱ्या घराण्यातील राजकुमारांची यादी दिली आहे; त्यापैकी पहिल्या तीन जणांच्या नावांत ‘राया’ हा शब्द आहे-वीर राया, गोविंद राया, कृष्ण राया. (संदर्भ : विल्सन, १८२८ : मॅकेन्झी कलेक्शन - डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग ऑफ द ओरिएन्टल मॅन्युस्क्रिप्ट्स, पृ. १९८)

Kurumba language origins | Konkani word etymology | Pallava dynasty history
Yadava Dynasty Battle: चित्रप्रभू चालून गेला, अल्लाउद्दिनचे पुत्र ठार झाले! तुर्की सैन्यात एकच बोंबाबोंब झाली; खिलजीची देवगिरीवर स्वारी

‘रायर्स’ हा शब्द विजयनगरच्या राजांसाठी वापरलेला आढळत असला, तरी राय आणि राया हे शब्द इतर राजघराण्यांसाठीही वापरले गेले. उदाहरणार्थ, चामुंडराय / चावुंडराय (इ.स. १० वे शतक)-ते तलाकाडू गंग राजांचे सेनापती आणि मंत्री होते. ते स्वतः राजा नसले तरी अनेकदा स्थानिक सरदारांना मोठ्या राजांच्या अधीनस्थ म्हणून ‘राय’ ही पदवी प्राप्त होत असे; चामुंडराय हे त्याचे उदाहरण असावेत.

सोळाव्या शतकापर्यंत बृहतकोकण आणि दख्खन भागात ‘राय’ हा शब्द ‘राजा’ या अर्थानेच प्रचलित होता. तो संस्कृत ‘राजा’ पासून निघालेला प्रकार असावा; वडुकरांच्या भाषेच्या प्रभावामुळे राया’ किंवा राय’ हा मृदू उच्चार तयार झाला असावा. नंतर संस्कृतीकरणाच्या प्रभावाखाली शब्द पुन्हा ‘राजा’ या संस्कृत रूपाकडे परत गेला असावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com