Consumer court: अभिनेत्री मौसमी चटर्जी यांना न्यायालयाचा मोठा झटका! कार्यक्रमाला दांडी मारणे पडले महाग; ३ लाखांच्या दंडासह नुकसान भरपाईचा आदेश

Moushumi Chatterjee Goa Event: एका निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी चटर्जी यांनी ३ लाख रुपये मानधनावर उपस्थित राहण्याचे मान्य केले होते.
Moushumi Chatterjee Goa Event
Consumer courtDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनासाठी मानधन घेऊनही उपस्थित न राहिल्याप्रकरणी अभिनेत्री मौसमी चटर्जी यांना नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने ३ लाख रुपये परत करण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच मानसिक त्रासासाठी १ लाख रुपये नुकसान भरपाई आणि २५ हजार रुपये खटल्याचा खर्च देण्याचे निर्देश दिले. एका निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी चटर्जी यांनी ३ लाख रुपये मानधनावर उपस्थित राहण्याचे मान्य केले होते.

Moushumi Chatterjee Goa Event
Deposit Refund Scheme: मद्याची बाटली आणा, दिलेले पैसे घेऊन जा! रिकामी बाटली 'कॅशबॅक'ची गुरुकिल्ली,1 सप्‍टेंबरपासून 'DRS' योजना सुरू

आयोजकांनी २ लाख रुपये आगाऊ देऊन विमानप्रवास, हॉटेल निवासाची व्यवस्था केली होती. मात्र, गोव्यात येऊनही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या नाहीत. ही घटना १७ नोव्हेंबर २०२३ रोजी घडली होती. दुसऱ्या दिवशीच त्‍या निघून गेल्या.

आयोगाचे निरीक्षण असे होते की, जर कथित अटींच्या उल्लंघनामुळे अभिनेत्री मौसमी चटर्जी यांना कार्यक्रम सादर करण्याची इच्छा नव्हती, तर त्यांनी कार्यक्रमापूर्वीच प्रवासाला जाण्यास नकार द्यायला हवा होता, जेणेकरून तक्रारदाराला पर्यायी व्यवस्था करता आली असती.

Moushumi Chatterjee Goa Event
Zomato platform fee hike: खवय्यांच्या खिशाला कात्री! झोमॅटोकडून प्लॅटफॉर्म फीमध्ये मोठी वाढ

अभिनेत्रीचा दावा फेटाळला

कार्यक्रमापूर्वी अटींची पूर्तता न झाल्याचा अभिनेत्रीच्या बाजूने दावा करण्यात आला. मात्र, अशा अडचणी असल्यास प्रवासापूर्वीच नकार देणे अपेक्षित होते, असे आयोगाने नमूद केले. कार्यक्रमाला अनुपस्थित राहणे ही ‘सेवेतील त्रुटी’ असल्याचे सांगत आयोगाने तक्रारदाराच्या बाजूने निर्णय दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com