Varsha Usgaonkar: मातृभाषा हीच सर्वश्रेष्ठ भाषा

माशेल सम्राट क्लबची गरुडभरारी, वर्षभर ‘वारसा’ संगीत मैफलीचे आयोजन
Varsha Usgaonkar
Varsha UsgaonkarDainik Gomantak
Published on
Updated on

मातृभाषा हिच सर्वश्रेष्ठ भाषा असते. जगाच्या पाठीवर कुठेही नावलौकिक मिळवा, पण आपल्या मातेसमान मातृभाषेचा विसर पडू देऊ नका. असे मत वर्षा उसगावकर यांनी सम्राट क्लब गोवा राज्य व सम्राट क्लब चोडण आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले. सम्राट क्लब माशेलला या पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक पुरस्कार मिळाले. ‘वारसा’बाबत विशेष गौरव प्राप्त झाला.

Varsha Usgaonkar
Illegal Shacks: खोला किनारी भागात चालतात बेकायदा शॅक्स

सम्राट स्टार गरुडा पुरस्कार वितरण समारंभ साखळी येथील रवींद्र भवनाच्या सभागृहात झाला. धर्मा चोडणकर, शैलेश बोरकर, दीपक नार्वेकर, रुपेश ठाणेकर व इतर संचालक मंडळ उपस्थित होते.

सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य -१ चे अध्यक्ष सम्राट शैलेश बोरकर, सचिव गोकुळदास कुडाळकर, खजिनदार सूरज नाईक, दीपक नार्वेकर, धर्मा चोडणकर व इतर पदाधिकारी अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या समवेत व्यासपीठावर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सम्राट क्लब माशेलला या पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट सार्वजनिक संबंध कार्यक्रम म्हणून सम्राट क्लब माशेलने आयोजित केलेल्या ‘कलाविष्कार’ या उपक्रमाला प्रथम पुरस्कार मिळाला. मे महिन्यात झालेल्या या उपक्रमाचे संयोजन सम्राट क्लब माशेलचे खजिनदार मगेश गांवकर यांनी केले होते.

Varsha Usgaonkar
Margao : ओल्ड रेल्वे स्टेशन परिसरात चोर बाजार सुरूच

सम्राट क्लब माशेल तर्फे ‘वारसा’ ही मासिक संगीत सभा आयोजित केली. गायिका सम्राट प्रचलाताई आमोणकर यांनी संयोजन केलेल्या या उपक्रमाला तृतीय पारितोषिक मिळाले.

सम्राट क्लब माशेलने गेल्या वर्षभरात आयोजित केलेल्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याची नोंद घेऊन सर्वोत्कृष्ट क्लब म्हणून द्वितीय पुरस्कारप्रदान करण्यात आला. अनिता रायकर यांना सर्वोत्कृष्ट अध्यक्ष म्हणून प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात

आले. सम्राटचा जीवन गौरव पुरस्कार साखळी सम्राट क्लबचे संस्थापक रवळू उर्फ दादासाहेब आमोणकर यांना देण्यात आला.

साखळी ‘सम्राट’ला विशेष पुरस्कार

गोव्यातील विविध सम्राट क्लब संचालकांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार देण्यात आले. तर काहींचा उत्कृष्ट उल्लेखनिय कामाबद्दल गौरव करण्यात आला. यात साखळीतील सम्राट क्लबला विशेष पुरस्कार चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते देण्यात आला. क्लबच्या अध्यक्ष मोनाली बेतकीकर यांना सदर पुरस्कार स्वीकारला. सूत्रसंचालन गोविंद भगत यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com