गोवा नाही तर 'या' ठिकाणी 31 डिसेंबरला बुक झाली सर्वाधिक हॉटेल्स?; OYO च्या सीईओने शेअर केला डेटा

गोव्यात OYO अॅप वापरणाऱ्यांमध्ये 50 टक्के वाढ
OYO Highest bookings on 31st December 2023:
OYO Highest bookings on 31st December 2023: Dainik Gomantak

OYO Highest bookings on 31st December 2023: गोवा हे भारतातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ, पार्टी डेस्टिनेशन आहेच. त्यामुळेच ख्रिसमस आणि न्यू ईयरला गोव्यात सेलिब्रेशन करण्यास पर्यटक प्राधान्य देत असतात.

यंदाही गोव्यात नेहमीप्रमाणे न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. तथापि, 31 डिसेंबर रोजी सर्वाधिक हॉटेल्स बुकिंग कोणत्या शहरात झाली याबाबतची माहिती समोर आली आहे.

या माहितीनुसार 31 डिसेंबर रोजी देशात सर्वाधिक हॉटेल्स बुकिंगचा शोध अयोध्या शहरात घेतला गेला होता. म्हणजेच न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येने लोकांनी, पर्यटकांनी अयोध्येला प्राधान्य दिले आहे.

OYO या ऑनलाईन हॉटेल बुकिंग करणाऱ्या कंपनीचे सीईओ रितेश अगरवाल यांनीच ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

OYO Highest bookings on 31st December 2023:
CM Pramod Sawant: निलेशाक रडपाची गरज ना! तो माझा क्लोज फ्रेंड; त्याचा त्याग वाया जाणार नाही...

31 डिसेंबर रोजी भारतातील इतर पर्यटन स्थळांच्या तुलनेत अयोध्येत हॉटेल रूम बुक करण्यासाठी सर्वाधिक सर्च झाले होते. OYO या आघाडीच्या हॉटेल बुकिंग साइटचे संस्थापक आणि सीईओ रितेश अग्रवाल यांनी एक डेटा शेअर केला आहे.

त्यानुसार अयोध्या हे पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे. हिल स्टेशन आणि समुद्र किनाऱ्यांच्या तुलनेत अयोध्येत जास्त बुकिंग दिसून आले आहे.

अग्रवाल यांनी X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 31 डिसेंबर रोजी 80 टक्के अधिक वापरकर्त्यांनी अयोध्येत राहण्यासाठी रूम्सचा शोध घेतला.

दुसर्‍या पोस्टमध्ये, OYO संस्थापकाने गोवा, अयोध्या आणि नैनितालची तुलना करणारा डेटा शेअर केला आहे. या डेटामुळे अयोध्येत OYO अॅप वापरकर्त्यांमध्ये 70 टक्के वाढ झाली आहे, तर नैनितालमध्ये 60 टक्के आणि गोव्यात 50 टक्के वाढ झाली आहे.

येत्या 5 वर्षांत अध्यात्मिक पर्यटन हा पर्यटन उद्योगातील सर्वात मोठा घटक म्हणून उदयास येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

OYO Highest bookings on 31st December 2023:
Goa Gold Smuggling: गोवा पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राज्यातील विमानतळांवरील सोने तस्करीत हात

दरम्यान, नवीन वर्षाच्या दोन दिवस आधी म्हणजेच 30 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येच्या महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आणि नव्याने नूतनीकरण केलेल्या रेल्वे स्टेशनचे (अयोध्या धाम रेल्वे स्टेशन) उद्घाटन केले

पंतप्रधान मोदींनी 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अयोध्येत येऊ नये, अशी विनंती जनतेला केली आहे. तुम्ही सर्व 23 जानेवारीपासून अनंतकाळपर्यंत येऊ शकता. राम मंदिर आता कायमचे आहे.

22 जानेवारी रोजी प्रत्येक भारतीय नागरिकाने आपल्या घरात दिवा लावावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com