Mormugao: बंदरातील ‘डोम’मुळे प्रदूषण कमी होणार! मुख्यमंत्र्यांची ग्वाही; मुरगाव भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा

CM Pramod Sawant: दामू नाईक यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आज भाजप देशात विकासकामे करून प्रगतीपथावर आहे.
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: मुरगाव बंदराला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला केंद्र व राज्य सरकारने ६०० कोटी रुपये खर्च केले आहे. कोळसा प्रदूषणावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी, मुरगाव बंदरात ‘डोम’ उभारला आहे. यामुळे ९५ टक्के कोळसा प्रदूषण नियंत्रणात येणार आहे. तसेच मुरगाव बंदरात आणखी कोळसा वाढणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मुरगाव भाजप कार्यकर्ता मेळाव्यात दिली.

‘डोम’ ची पाहणी मुरगावातील जनतेबरोबर करून त्यांना कोळसा प्रदूषणावर कशाप्रकारे नियंत्रण आणले जाते, त्याची प्रत्यक्षात माहिती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

सडा येथील भारतरत्न डॉ. आंबेडकर सभागृहात मुरगाव भाजप कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी त्यांच्यासमवेत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, सरचिटणीस तथा अनिवासी भारतीय आयुक्त ॲड. नरेंद्र सावईकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, दक्षिण गोवा भाजप अध्यक्ष प्रभाकर गावकर, सचिव सर्वानंद भगत, रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव, उपाध्यक्ष डॉ. धमेंद्र प्रभुदेसाय, माजी राज्य आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष संजय सातार्डेकर, मुरगाव भाजप गटाध्यक्ष ॲड. अविनाश नाईक, सरचिटणीस दीपक म्हाळसेकर, जगदीश गवंडे, नगरसेविका श्रध्दा आमोणकर, मुरगाव भाजप प्रभारी संतोष केरकर, माजी उपनगराध्यक्ष रिमा सोनुर्लेकर व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

CM Pramod Sawant
Goa BJP: काँग्रेस हा महाभयंकर दुष्ट पक्ष! CM सावंताचे सांताक्रुझ मेळाव्यात टीकास्त्र; 2027 मध्ये 27 आमदार आणण्याचा केला दावा

आमदार संकल्प आमोणकर यांनी सांगितले की, मुरगाव बंदरातील कोळशावर ‘डोम’ उभारल्याने सडा, जेटी, रुमडावाडा, बोगदा परिसरात होणाऱ्या प्रदूषणावर बऱ्यापैकी नियंत्रण येणार आहे.

CM Pramod Sawant
Goa BJP: काँग्रेस संपली! 'त्यांनी केलेली पापं जनतेसमोर येतायेत, ती आलीही पाहिजेत'; भाजप प्रदेशाध्यक्ष

कार्यकर्त्यांनी पदाचा मान राखावा ः दामू नाईक

दामू नाईक यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आज भाजप देशात विकासकामे करून प्रगतीपथावर आहे. समाजातील प्रत्येकाला राज्य सरकार सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेत आहे. अंत्योदय योजनेंतर्गत भाजप प्रत्येकाला योजना पोहचवत आहे. तसेच प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांनी जबाबदारीने कार्य करावे, आपल्याला दिलेल्या पदाचा मान राखावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com