Mormugao: '..अन्यथा बेमुदत संपावर जाऊ'! मुरगाव पालिका कर्मचारी एकवटले, मागण्या पूर्ण करण्यासाठी ‘पेन व टूल्स डाऊन’

Mormugao Protest: दरम्यान, कामगारांच्या संपामुळे पालिका क्षेत्रातील कचरा उचल होऊ शकली नसल्याचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी सांगितले.
Mormugao Protest
Mormugao ProtestDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यास चालढकल होत असल्याने मुरगाव पालिका कार्यालयातील कर्मचारी, सफाई व इतर कामगारांनी शुक्रवारी (ता. २४) एक दिवसीय ‘पेन व टूल्स डाऊन’ संप केला. या आमच्या मागण्यांचा विचार करण्यात आला नाही, तर पुढील कृती करताना बेमुदत संपावर जाण्याचा इशारा गोवा पालिका कामगार संघटनेशी संलग्न असलेल्या मुरगाव पालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष महेश साळगावकर यांनी दिला आहे.

दरम्यान, कामगारांच्या संपामुळे पालिका क्षेत्रातील कचरा उचल होऊ शकली नसल्याचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी सांगितले.

आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर शुक्रवारी (ता.२४) एक दिवसीय संप पुकारणार असल्यासंबंधी नोटीस गुरुवारी दिली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळपासून संप पुकारला. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पेन डाऊन केले तर सफाई कामगार, चालक व इतर कामगारांनी टूल्स डाऊन केले. त्यामुळे मुरगाव पालिकेच्या दैनंदिन कामावर मोठा परिणाम झाला. सर्व कामगारांनी मुरगाव पालिका कार्यालय इमारतीसमोर जमून निदर्शने केली.

महेश साळगावकर यांनी आमच्या मागण्याबाबत पालिका मंडळ गंभीर नसल्याचा दावा केला. ते म्हणाले की, जुना वेतन व इतर मागण्यासंबंधीचा करार २०२१ संपल्यावर नवीन करार झाला पाहिजे होता. परंतु पालिकेची आर्थिक स्थिती डळमळीत झाल्याचा दावा करून आम्हाला करारासंबंधी नेहमी आश्वासने देण्यात आली. आता पाच वर्षे झाली, तीन नगराध्यक्ष बदलले. केवळ परिस्थितीचा विचार करून आम्ही कळ सोसली, असे ते म्हणाले.

ज्यांना बढत्या देण्यात आल्या नाहीत, त्यांना मॉडिफाइड अश्युअर्ड करिअर प्रोग्रस,लाभ देण्यात आला नाही. तसेच वैद्यकीय भत्ता संबंधी प्रत्येकी तीन वर्षानंतर करार करण्यात येतो. तो गेले सहा वर्षे करण्यात आला नाही. त्यामुळे आम्हाला नुकसान सहन करावे लागते. आता त्या भत्त्याची सर्व रक्कम आम्हाला एकरकमी देण्यात यावी.

Mormugao Protest
Mormugao Municipal Election: मुरगाव पालिका प्रभागवाढ ठरणार लक्षवेधी, विद्यमान नगरसेवकांच्या धावपळीला ब्रेक; आरक्षणावर अनेकांची नजर

गेल्या काही वर्षांत पालिकेमध्ये नोकर भरती झालीच नाही. जे सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांच्या जागी नवीन कामगार घेण्यात आलेले नाहीत. सुमारे १०० जागा रिक्त आहेत, त्या जागांवर तात्पुरत्या स्वरूपात असलेल्या कामगारांना, कर्मचाऱ्यांना बढत्या देऊन त्यांना कायमस्वरूपी दर्जा देण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांत या जागांसंबंधी काहीच हालचाल न झाल्याने त्या जागा रद्द झाल्या आहेत,त्या पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे. तसेच इतर मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाही, असे कामगारानी सांगितले.

Mormugao Protest
Mormugao: वास्कोत दोन कंत्राटदारांमध्ये संघर्ष, कचरा उचल कामावर परिणाम; कारभार सुधारण्यास पालिकेकडून 15 दिवसांचा अवधी

कामगारांच्या प्रलंबित मागण्या

ज्यांना बढत्या देण्यात आल्या नाही, त्या दहा वर्षानंतर मॉडिफाइड अश्युअर्ड करिअर प्रोग्रेस लाभ देणे, रिक्त असलेल्या पदांची भरती करणे, वैद्यकीय भत्ता लाभ, बोनस इत्यादीसाठी कामगारांनी हा संप पुकारला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com