Mormugao: वास्कोत दोन कंत्राटदारांमध्ये संघर्ष, कचरा उचल कामावर परिणाम; कारभार सुधारण्यास पालिकेकडून 15 दिवसांचा अवधी

Mormugao Conflict: मुरगाव पालिकेने दारोदार कचरा गोळा करण्यासाठी नियुक्त केलेल्या दोन कंत्राटदारांमध्ये संघर्ष निर्माण झाल्यामुळे शहरातील काही प्रभागांमध्ये कचरा गोळा करण्याच्या कामाला विलंब होत आहे.
Mormugao garbage contractor conflict
Mormugao garbage contractor conflictDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: मुरगाव पालिकेने दारोदार कचरा गोळा करण्यासाठी नियुक्त केलेल्या दोन कंत्राटदारांमध्ये संघर्ष निर्माण झाल्यामुळे शहरातील काही प्रभागांमध्ये कचरा गोळा करण्याच्या कामाला विलंब होत आहे. त्यामुळे त्यांच्यातील एक कंत्राटदार मेसर्स बापू एन्हायर्नमेंटल सर्विसला कारभार सुधारण्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन समितीची बैठक गुरुवारी झाली. यावेळी नगराध्यक्ष गिरीश बोरकर, उपनगराध्यक्ष रामचंद्र कामत, मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक, घनकचरा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायण बोरकर, नगरसेवक दामोदर नाईक, नगरसेविका शमी साळकर, नगरसेविका श्रध्दा महाले, अभियंते आगुस्तिनो मिस्कीता, अभियंते आर्सेकर, इतर अधिकारी, दारोदार कचरा गोळा करण्यासाठी नेमण्यात आलेले कंत्राटदार, त्यांचे पर्यवेक्षक आदी उपस्थित होते.

बापू एन्हायर्नमेंटल सर्विसकडे काम करणाऱ्या एका व्यक्तीने आपली स्वतःची रतन एंटरप्रायझेस एजन्सी सुरू केली आहे. हे दोन्ही कंत्राटदार सडा, बोगदा व इतर परिसरातील कचरा गोळा करण्याचे काम करतात. परंतु त्यांच्यामध्ये आता हितसंबंध जोपासण्यावरून संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे शहरातील कचरा गोळा करण्याच्या कामावर परिणाम होत आहे. काही वेळा दोन-तीन दिवस कचरा उचल होत नसल्याचे नगरसेवक दामोदर नाईक यांनी यावेळी सांगितले.

याप्रकरणी सविस्तर चर्चा करण्यात आली. बापू एन्हायर्नमेंटल सर्विसने आपली सेवा सुधारावी यासाठी त्यांना पंधरा दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. काही सुधारणा न झाल्यास पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

Mormugao garbage contractor conflict
Vasco: कोमुनिदादच्या जमिनीवरील 19 आलिशान बांधकामांवर फिरणार बुलडोझर, आदेश जारी; 'त्या' राजकीय नेत्याचे प्रयत्न ठरले विफल

दारोदार कचरा गोळा करतेवेळी काहीजण कचरा वर्गीकरण करून देत नाही. त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. काहीजण कचरा देतात, परंतु कचरा गोळा करण्याचे शुल्क देत नाही. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Mormugao garbage contractor conflict
Vasco: कचरावाहू ट्रक मुरगाव पालिकेच्या ताफ्यात, नगराध्यक्षांच्या हस्ते लोकार्पण

...तर नवीन चालक सेवेत घेणार

पालिकेने साळगाव येथील कचरा प्रकल्पात घनकचरा वाहून नेण्यासाठी गेल्या सप्ताहात मोठा ट्रक खरेदी केला आहे. या ट्रकसाठी चार चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी प्रत्येकी तीन महिने हा ट्रक साळगावला नेला पाहिजे, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र, हे चालक हे काम करण्यासाठी तयार नसल्याचे समजते. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यात आली. ते जर काम करण्यास तयार नसतील, तर नवीन चालकांना सेवेत घ्यावे, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com