

वास्को: व्यापार परवाना न घेता व्यवसाय सुरू करणाऱ्या एका व्यायसिकाच्या दुकानाला मुरख़गाव पालिकेने सोमवारी सील ठोकले. व्यापार परवाना न घेता तसेच भाडे थकबाकी न भरणाऱ्या आस्थापनांविरोधात मुरगाव पालिकेने मोहीम सुरू केली आहे.
काही आस्थापनांना भाडे थकबाकी भरण्यासाठी तसेच व्यापार परवान्यांचे नूतनीकरण करण्यासंबंधी नोटिसा दिल्या आहेत. त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यास त्यांच्या आस्थापनांना सील ठोकण्यात येईल, असे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी सांगितले.
पालिकेकडून व्यापार परवाना न घेता किंवा घेतलेल्या परवान्याचे नूतनीकरण न करता येथे काही व्यावसायिक व्यवसाय करतात. काहीजण आपल्या व्यवसायामध्ये बदल करताना नवीन व्यापार परवाना न घेता बिनदिक्कतपणे व्यवसाय सुरू करतात.
आपले दुकान चकाचक करण्यासाठी लाखो रुपये खर्च करणारे काही व्यावसायिक व्यापार परवाना घेण्याची तसदी घेत नाही. येथील काही पेट्रोल पंपमालकांनी आपल्या लीज कराराची प्रत पालिकेला दिली नाही.
तसेच काहीजणांनी नवीन भाडेदरानुसार भाडेपट्टी भरली नाही. त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांनी या गोष्टींची पूर्तता केली नाही, तर त्या पेट्रोल पंपांनाही सील ठोकण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
येथील एका मोबाईल कंपनीने आपले कार्यालय बंद केल्यावर तेथे अन्य व्यक्तीने त्या दुकानाचे नूतनीकरण करून नवीन व्यवसाय सुरू केला होता. त्यासाठी त्या व्यक्तीने पालिकेकडून कोणताही व्यापार परवाना घेतला नाही. याप्रकरणी त्या व्यक्तीला नोटीस देण्यात आली होती. सात दिवसांच्या अवधीत त्या व्यक्तीने कोणतेही उत्तर न दिले नाही.
त्यामुळे दहाव्या दिवशी त्या व्यक्तीच्या दुकानाला सील ठोकण्यात आले. याप्रसंगी मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक, युडिसी मंगलदार खांडेपारकर, तसेच पालिका निरीक्षक जातीने उपस्थित होते.
ज्यांनी व्यापार परवाना न घेता व्यवसाय सुरू केला आहे, तसेच ज्यांनी आपल्या परवान्याचे नूतनीकरण केले नाही, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. येथील एका व्यापार संकुलात काहीजणांनी पालिकेकडून व्यापार परवाना न घेता व्यवसाय सुरू केला आहे. त्यांना नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. भाडेपट्टी थकबाकी न भरणाऱ्याविरोधातही कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
थकबाकी न भरणे, व्यापार परवाना नसणे किंवा नूतनीकरण न करणे तसेच इतर कागदपत्रे नसलेल्यांचा शोध घेण्यासाठी पालिकेने पाच पथके तयार केली असल्याचे मुख्याधिकारी नाईक यांनी सांगितले. आतापर्यंत २०० पेक्षा अधिकजणांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या आहे. त्यांना भरपूर वेळ देण्यास येऊनही त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे आम्ही कारवाई करण्यास आरंभ केला आहे. ज्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत, त्यांनी योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच महसूल मिळत नसल्याने विकासकामांवर परिणाम होत असल्याचे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.