Dawood Associate Arrested In Goa: मोठी बातमी! दाऊदच्या जवळच्या माणसाला गोव्यात अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

Mumbai NCB Arrests Dawood Associate Danish Merchant : दानिश मर्चंटला दानिश चिकना म्हणून देखील ओळखले जाते. अमली पदार्थ प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Dawood Ibrahim aide arrested Goa
Underworld don Dawood Ibrahim And Danish ChiknaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याचा जवळचा व्यक्ती दानिश मर्चंट याला मुंबई पोलिसांनी गोव्यात अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) हणजूण येथून त्याला अटक केली. दानिश मर्चंटला दानिश चिकना म्हणून देखील ओळखले जाते. अमली पदार्थ प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

दानिश चिकना दाऊदचा जवळचा माणूस असून, तो मुंबईती डोंगरी भागात दाऊच्या अमली पदार्थ रॅकेटचा व्यवसाय सांभाळतो. मुंबई पोलिसांनी दानिशला गेल्यावर्षी देखील मुंबईतून अटक केली होती.

२०१९ मध्ये मुबंई पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी पथकाने दाऊदची डोंगरीतील ड्रग फॅक्टरी उद्धवस्त केली होती. यावेळी कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.

Dawood Ibrahim aide arrested Goa
कॅमरुन नागरिकाला शिवोलीत अटक, एक लाखांचे कोकेन, 6.81 लाखांची रोकड जप्त; लव्ह स्टोरी व्हिलाजवळ कारवाई

अमली पदार्थ रॅकेटशी संबधित त्याच्यावर अनेकवेळा कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत अमली पदार्थ रॅकेट चालविल्याप्रकरणी दानिश मर्चंट उर्फ दानिश चिकना याला २०२१ मध्येही अटक करण्यात आली होती.

त्यावेळी त्याच्याकडे २०० ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ आढळून आला होता. पोलिसांनी यावेळी सुरु केलेल्या कारवाईत दानिश चिकनाचे नाव समोर आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com