...तर गोव्यात स्वस्त टॅक्सीसेवा सुरु करण्यासाठी निर्णय घेणार : मॉविन गुदिन्हो

नवीन टॅक्सींना परवाने न देण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करणार असल्याचंही वक्तव्य
Mauvin Godinho
Mauvin GodinhoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोव्यातील जनतेला इतर राज्यांप्रमाणे अॅपवर आधारित स्वस्त टॅक्सी सेवा हवी असेल तर राज्य सरकार आपला निर्णय बदलून ही सेवा सुरु करण्याचा विचार करेल, असं वक्तव्य वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी केलं आहे. गोव्यात सध्या सरकारने नवीन टॅक्सींना तसेच रेंट अ बाईक आणि कारना परवाने न देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र लोकांच्या मागणीखातर सरकार आपला निर्णय बदलण्याचा विचार करेल असं गुदिन्हो यांनी स्पष्ट केलं आहे.

Mauvin Godinho
नुवे येथे तरुणाचा इमारतीवरून पडून मृत्यू

गोव्यात स्थानिक टॅक्सीचालक आणि गोवा माईल्सच्या टॅक्सी चालकांमधील दुही काही संपताना दिसत नाहीए. त्यामुळे सध्या अॅपवर आधारित टॅक्सींना गोव्यात सरकारने परवाने देण्यावर बंदी आणली आहे. गोव्यात ठिकठिकाणी स्थानिक टॅक्सीचालक आणि गोवा माईल्स चालकांमध्ये नेहमीच खटके होत असल्याचं अनेकवेळा दिसून आलं आहे. मात्र स्थानिक टॅक्सीचालकांकडून पर्यटकांची लूट होत असल्याचाही आरोप सातत्याने केला जात आहे.

Mauvin Godinho
अपघातानंतर तत्काळ प्रथमोपचार महत्त्वाचे: डॉ. कौशिक सरकार

गोव्यात मीटरवर आधारित टॅक्सीसेवा सुरु करण्यासाठी सरकारने पावलं उचलली असली तरी अजूनही त्याची सक्ती करण्यात न आल्याने स्थानिक टॅक्सीचालकांची मनमानी सुरुच आहे. गोवा वगळता अन्य राज्यात ओला, उबरसारखे स्वस्त आणि अॅपच्या माध्यमातून चालणाऱ्या सेवा चालवल्या जातात. मात्र गोव्यात एकमेव असलेल्या गोवा माईल्सला स्थानिक टॅक्सीचालकांचा मोठा विरोध आहे. सर्वसामान्य जनतेची मागणी असेल तर आपण ही बंदी उठवण्याचा विचार करणार असल्याचं मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी म्हटलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com