मंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या अभिनेता गौरव बक्षीला कोलवाळ पोलिसांनी अटक केली आहे. गौरव विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर हळर्णकरांच्या समर्थकांनी त्याला अटक करण्याची मागणी केली. बेपत्ता असलेल्या गौरवला अखेर कोलवाळ पोलिसांनी शोधून अटक केलीय.
रेवोडा पंचायतीजवळ बुधवारी (१० जुलै) सायंकाळी चारच्या सुमारास अभिनेता गौरव बक्षी आणि मंत्री हळर्णकरांचे पीएसओ व कारचालक यांच्यात वाद झाला. यानंतर दोघांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, मंत्री हळर्णकरांचे समर्थक आक्रमक झाल्यानंतर कोलवाळ पोलिसांनी बक्षी विरोधात गुन्हा नोंद केला.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना याप्रकरणी विचारणा केली असता बक्षीला अटक होईल, असे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री सावंत यांच्या या वक्तव्यानंतर तीन तासांत गौरवला पोलिसांनी अटक केलीय.
अभिनेता गौरव बक्षी आणि मंत्री नीलकंठ हळर्णकर रेवोडा पंचायत परिसर असताना कार मागे घेण्यावरून वाद झाला. बक्षीने मंत्र्याचे पीएसओ व कारचालक यांच्याशी हुज्जत घातली तसेच, मंत्री हळर्णकरांना अपशब्द वापरले असा, आरोप करण्यात आला. याप्रकरणी मंत्री हळर्णकरांनी पत्रकार परिषद घेऊन देखील माहिती दिली.
मंत्री हळर्णकरांच्या समर्थकांनी बक्षीला अटक करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.