Mopa Airport: "दोतोर! वाढदिवसाच्या दिवशी तोडगा काढा" जीएमआरने पार्किंग दर वाढवल्याने टॅक्सी चालक आक्रमक

Goa taxi driver protest: जीएमआर कंपनीने अचानक पार्किंगच्या पैशांमध्ये वाढ केल्याने शिव वॉरियर्स टॅक्सी संघटनेन या निर्णयाचा निषेध व्यक्त केलाय
GMR fee hike taxi issue
GMR fee hike taxi issueDainik Gomantak
Published on
Updated on

मोपा: उत्तर गोव्यातील मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळावर जीएमआर कंपनीने अचानक पार्किंगच्या पैशांमध्ये वाढ केल्याने शिव वॉरियर्स टॅक्सी संघटनेन या निर्णयाचा निषेध व्यक्त केलाय. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा झाल्यानंतर स्थानिक टॅक्सी चालकांना पंचायत सदस्य, स्थानिक आमदार यांच्यासह जीएमआर कंपनीचा प्रतिनिधी तसेच शिव वॉरियर्स टॅक्सी संघटनेचा प्रतिनिधी अशा लोकांची बैठक घेऊनच दरवाढ केली जाण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र सध्या असं काहीही न होता अचानक दरवाढ करण्यात आलीये.

स्थानिक टॅक्सी चालकांना ही दरवाढ मंजूर नाही, जीएमआरने कुठलेही संकेत न देता किंवा पूर्व माहिती न देता अचानक पार्किंगचे दर वाढवल्याने नुकसान होणार असल्याचा दावा करत त्यांनी निषेध करायला सुरुवात केलीये. यापूर्वी अर्ध्या तासासाठी ८० रुपये तर यापेक्षा जास्ती वेळ गाडी पार्किंगसाठी १३० रुपये दिले जायचे मात्र आता कुठलीही पूर्णकल्पना न देता जारी केलेला आदेश २५ एप्रिल पासून लागू केला जाणार असून यात पार्किंगचे दर वाढणार आहेत.

सतत होणारा हा गोंधळ रोखण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांच्याकडून केली जातेय. एक खासगी कंपनी जर का येऊन अचानक दादागिरी करणार असेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही असा थेट इशारा टॅक्सी चालकांनी दिलाय.

GMR fee hike taxi issue
Goa Taxi Issue: नीज गोवेकरांची रोजीरोटी वाचवा! टॅक्सीचालकांची मागणी; ॲप टॅक्सीवाल्यांवर कारवाईसाठी दिले निवेदन

आजचा घडीला विमानतळावरील वेगवेगळ्या टॅक्सी चालकांकडून या पार्किंगचा वापर केला जातोय, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जन्मदिवशी या प्रकरणाचा छडा लावावा असं टॅक्सी चालक म्हणाले आहेत, तसेच संध्याकाळ पर्यंत मुख्यमंत्री एखादा निर्णय कळवतील अशी अशा देखील ते बाळगून आहेत.

पर्यटकांना सेवा पुरवण्यासाठी हे पार्किंग अत्यंत सोयीस्कर आहे, आणि या निर्णयामुळे विनाकारण ३०० रुपये देखील भरावे लागतील अशी भीती व्यक्त करत त्यांनी स्थानिकांना या निर्णयाला विरोध करण्याचं आवाहन केलं आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी टॅक्सी चालक पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. भाजपच्या राज्यात भाजपच्या समर्थकांना नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com