Goa Taxi Drivers: हॉटेल-टॅक्सी अ‍ॅपच्या संगनमतामुळे स्थानिक टॅक्सी चालकांचा व्यवसाय धोक्यात, हॉटेल व्यवस्थापनांना दिला कडक इशारा

hotel App Taxi Alliance Goa: हॉटेल व्यवस्थापने टॅक्सी ॲप ॲग्रीगेटर्सशी संगनमत करत असल्याचा आरोप वार्का येथील पर्यटक टॅक्सी ऑपरेटरनी केला आहे.
Goa Taxi Drivers
Goa Taxi DriversDaimik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: हॉटेल व्यवस्थापने टॅक्सी ॲप ॲग्रीगेटर्सशी संगनमत करत असल्याचा आरोप वार्का येथील पर्यटक टॅक्सी ऑपरेटरनी केला आहे. बाहेरील पर्यटक टॅक्सी त्यांच्या डोळ्यांदेखत हॉटेलमधील पर्यटकांना घेऊन जातात आणि त्यांच्या व्यवसायावर परिणाम करतात. अशावेळी ते मूक प्रेक्षक बनून राहू शकत नाहीत, असा दावा या टॅक्सी ऑपरेटरनी केला.

या बाहेरील टॅक्सी ऑपरेटरनी त्यांच्या वाहनांमध्ये चाकू आणि तलवारीसारखी शस्त्रे देखील ठेवली आहेत असा दावा करून स्थानिक पर्यटक टॅक्सी ऑपरेटरनी हॉटेल्सनी बाहेरील ऑपरेटरना त्यांचा व्यवसाय हिरावून घेण्यापासून रोखले नाही, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा या टॅक्सी ऑपरेटरनी दिला आहे.

या पर्यटक टॅक्सी ऑपरेटरना वार्कातील सामाजिक कार्यकर्ते वॉरन आलेमाव यांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यांनीही स्थानिक पर्यटक टॅक्सी ऑपरेटरांच्या हिताचे रक्षण करण्याचा मुद्दा उचलून धरताना हॉटेल व्यवस्थापनांना कडक इशारा दिला आहे.

पर्यटक टॅक्सी ऑपरेटर आणि माजी वार्का सरपंच जुझे आफोन्सो म्हणाले की, बाहेरील टॅक्सीचालक स्थानिक टॅक्सी ऑपरेटरच्या डोळ्यांदेखत हॉटेलमधील पर्यटकांना गोळा करतात, त्यामुळे त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण होते. जुझे म्हणाले की, आपण वार्का पंचायतीचा सरपंच होतो आणि मला माहिती आहे की, ही हॉटेल्स स्थानिक बेरोजगार तरुणांना पाठिंबा देण्याचे आश्वासन व्यवस्थापनांनी दिल्यानंतर उभी झाली होती, असे ते म्हणाले. एक टुरिस्ट टॅक्सी ऑपरेटर ब्रिटो फर्नांडिस यांनीही अशाच भावना व्यक्त केल्या.

सरकारने हस्तक्षेप करावा

वार्का टुरिस्ट टॅक्सी ऑपरेटर्सना पाठिंबा देताना वॉरन आलेमाव म्हणाले की, बाहेरील टॅक्सी ऑपरेटर्स हेच खरे माफिया आहेत. कारण ते स्थानिक ऑपरेटर्सना व्यवसाय नाकारतात. स्थानिक पर्यटक टॅक्सीचालकांचा संयम सुटत चालला आहे. हे बाहेरील टॅक्सीचालक शस्त्रे घेऊन येतात. स्थानिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकारी अधिकारिणींनी हस्तक्षेप करावा, असे मागणी आलेमाव यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com