Goa Crime: धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला, पण पुरावेच गायब? ‘मोयरा बार’ हाणामारी प्रकरणातील सहाही संशयितांची निर्दोष मुक्तता

moira bar sword attack case suspects acquitted goa: ‘मोयरा बार’ येथे हाणामारी आणि हत्येच्या प्रयत्नाच्या खटल्यात त्यांना म्हापसा पोलिसांनी अटक केले होते.
moira bar sword attack case suspects acquitted goa
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: १८ डिसेंबर २०१७ रोजी मोयरा क्लब परिसरात रवी नाईक या व्यक्तीवर काहीजणांनी तलवार, बेसबॉल बॅट आणि धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप असलेल्या सहाही संशयितांची अतिरिक्त सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. ‘मोयरा बार’ येथे हाणामारी आणि हत्येच्या प्रयत्नाच्या खटल्यात त्यांना म्हापसा पोलिसांनी अटक केले होते.

याप्रकरणी म्हापसा पोलिस स्थानकात भारतीय दंडसंहिता आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी जोकिम डिकॉस्टा, सूर्येश (बाबू) आरोलकर, आश्वेक वालावलकर, विनय गडेकर, सनी मिठापारा आणि विजय करबोटकर यांना अटक केली होती.

moira bar sword attack case suspects acquitted goa
Goa Crime: सॅम्युअलचा बळी नक्की कोणामुळे?यंत्रणेवरच्या विश्‍वासाचा 'कचरा'!

सुनावणीदरम्यान, सरकारी पक्षाने सादर केलेले महत्त्वाचे साक्षीदार, ज्यात बार मालक आणि पीडित रवी नाईक यांचा समावेश होता, ते आपल्या जबाबावरून फिरले. बार मालकाने सर्व हल्लेखोर मास्क घातलेले असल्याचे सांगत त्यांची ओळख पटवण्यास असमर्थता दर्शवली. तसेच, अन्य प्रत्यक्षदर्शींनीही संशयितांची ओळख पटवली नाही.

moira bar sword attack case suspects acquitted goa
Goa Crime Branch: गोव्याच्या सुरक्षेशी खेळ थांबवा! अवैध घुसखोरांच्या मुद्द्यावरुन नितीन फळदेसाईंचा हल्लाबोल; गुन्हे शाखेच्या 'त्या' निष्कर्षावर मोठे प्रश्नचिन्ह

सबळ पुराव्यांचा अभाव

न्यायालयाने (Court) आपल्या निकालात नमूद केले की, केवळ दुखापत झाली आहे म्हणून ती संबंधित संशयितांनीच केली आहे, असे सिद्ध होत नाही. तपासातील त्रुटी, जप्तीचा पंचनामा न मिळणे आणि पुरावा कायद्याच्या कलमांतर्गत इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचे प्रमाणपत्र नसणे या गोष्टी संशयितांच्या बाजूने गेल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com