पणजी (Panaji): सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये पर्यावरणाच्या संरक्षणासाठी तरतूद नाही. राज्यातील बेरोजगारी वाढली आहे. दक्षिण गोव्यातील (South Goa) रुग्णालयांसाठी भरीव तरतूद केलेली नाही. सरकारने केवळ घोषणा करण्याऐवीज अंमलबजावणी करावी, अशी मागणी कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव (MLA Yuri Alemao) यांनी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Goa CM Dr. Pramod Sawant) यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना ते बोलत होते.
(MLA Yuri Alemao demanded substantial provision for hospitals in South Goa)
सरकारने आरोग्य खात्यासाठी काही चांगल्या तरतुदी केल्या आहेत. पण दोन्ही जिल्ह्यांतील सरकारी इस्पितळात कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने रुग्णांना विविध चाचण्यांसाठी एक महिन्यांनंतरची वेळ दिली जाते. खासकरून अँजिओप्लास्टीसाठी येणाऱ्या रुग्णांना ही समस्या अधिक भेडसावत आहे. सरकारने दक्षिण गोव्यात अन्न व औषधे प्रशासनाच्या वतीने प्रयोगशाळा उभारण्याची घोषणा केली होती. त्याची अद्याप पूर्तता झालेली नाही. ‘अटल सेतू’वर खड्डे पडले आहेत. झुवारी पुलावर निरीक्षण मिनार उभारण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. पण सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी निरीक्षण मनोरा पुलाच्या कामाचा भाग नसल्याचे सांगितले होते. अर्थसंकल्पात म्हादईसाठी तरतूद नसल्याचे आलेमाव म्हणाले. (Goa Government News)
कुंकळ्ळीत सुविधांचा अभाव
कुंकळ्ळीतील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. पाणीपुरवठा सुरळीत नाही. विजेचीही समस्या आहे. बेरोजगारीवर मात करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद नसल्याची खंत आलेमाव यांनी व्यक्त केली. संजीवनी हा राज्यातील एकमेव साखर कारखाना सरकारने तो बंद पडू देता कामा नये. कृषीमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी केली. पायाभूत सुविधा उभारण्यात हयगय केल्याने तसेच उभारलेली व्यवस्था कुचकामी असल्याने राज्यात होऊ घातलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गुजरातला गेल्या, असे ते म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.