'गोव्यासाठी पोस्टाचं वेगळं सर्कल करा, गोमंतकीयांनाच पोस्टमन म्हणून संधी द्या'; सरदेसाईंचे ज्योतिरादित्य शिंदेंना पत्र

Vijai Sardesai letter to Jyotiraditya Scindia: विजय सेदसाईंनी अलिकडेच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात स्टिंग ऑपरेशनद्वारे राज्यात नियुक्त केलेल्या पोस्टमनचा सावळा गोंधळ उघडकीस आणला होता.
Vijai Sardesai letter to Jyotiraditya Scindia
Vijai Sardesai letter to Jyotiraditya ScindiaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: ‘गोव्यासाठी पोस्टाचे वगेळे सर्कल तयार करा, राज्यात पोस्टमनपदासाठी गोमंतकीयांनाच प्राधान्य द्या,’ अशा प्रकारची मागणी करणारे पत्र फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना लिहले आहे. ४९ गोमंतकीयांना हटवून राज्यात महराष्ट्रातील पोस्टमन नियुक्त केल्याचा मुद्दा देखील सरदेसाईंनी उपस्थित केला.

विजय सेदसाईंनी अलिकडेच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात स्टिंग ऑपरेशनद्वारे राज्यात नियुक्त केलेल्या पोस्टमनचा सावळा गोंधळ उघडकीस आणला होता. तसेच, ४९ गोमंतकीयांना कमी करुन त्या जागी महाराष्ट्रातील पोस्टमनची नियुक्त केल्याचा मुद्दा त्यांनी मांडला होता. याप्रकरणी त्यांनी आता थेट केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्र लिहून या प्रकरणाचे गांभीर्य नमूद केले आहे.

Vijai Sardesai letter to Jyotiraditya Scindia
गर्दीला करा बाय! मुंबई ते कोकण प्रवास आता फक्त 3 तास, 'या' दिवशीपासून सुरू होणार Ro-Ro Ferry सेवा

विजय सरदेसाईंनी पत्र काय म्हटलंय?

“राज्यातील ४९ गोमंतकीय पोस्टमन हटवून त्याठिकाणी महाराष्ट्रातील पोस्टमनना नियुक्त करण्यात आले आहे. यामुळे पोस्टाच्या कार्यक्षमता आणि सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नव्याने नियुक्त केलेल्या पोस्टमनना राज्यातील गावं, त्यांचा पत्ता आणि स्थानिक परिसराची माहिती नसल्याने पोस्ट मूळ पत्त्यावर पोहोचत नाही,” असे सरदेसाईंनी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

Vijai Sardesai letter
Vijai Sardesai letter to Jyotiraditya ScindiaDainik Gomantak

यामुळे पत्रं, सरकारी नोटीस मूळ व्यक्तीपर्यंत पोहोचत नाहीयेत. पत्ता मिळत नसल्याने त्याची चौकशी करत फिरतात. पण, पत्ता नाहीच मिळाला तर पत्रं, नोटीस फेकून दिल्या जातात, असा आरोपही सरदेसाई यांनी पत्रातून केला आहे.

यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये भीती, चिंता पोस्टाबाबत अविश्वास निर्माण झाल्याचे सरदेसाईंनी म्हटले आहे.

Vijai Sardesai letter to Jyotiraditya Scindia
The Castle Auction: कोट्यवधींना होणार सूझांच्या 'द कॅसल' चित्राचा लिलाव, भारतातील या दुर्मिळ कलाकृतीची खासियत काय?

सरदेसाईंनी शिंदे यांच्याकडे काय मागणी केलीय?

१)   गोव्यात पोस्टाच्या नोकरीसाठी स्थानिक गोमंतकीयांनाच संधी देण्यात यावी.

२)   तसेच, गोव्यासाठी वेगळं पोस्टाचे सर्कल निर्माण करण्यात यावं.

राज्यातील नागरिकांना तसेच, सरकारी कार्यालयांसाठी हे महत्वाचे असल्याचे सरदेसाईंनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com