गर्दीला करा बाय! मुंबई ते कोकण प्रवास आता फक्त 3 तास, 'या' दिवशीपासून सुरू होणार Ro-Ro Ferry सेवा

Mumbai Konkan Ro-Ro Ferry: महाराष्ट्र सरकारने १ सप्टेंबरपासून मुंबई ते कोकणदरम्यान आणखी एक रो-रो फेरी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे
mumbai to ratnagiri ro ro ferry
mumbai to ratnagiri ro ro ferryDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai-Konkan Ro-Ro Ferry Details: कोकणात जाताना पावसाळ्यात रेल्वे प्रवासाचा एक वेगळाच आनंद असला तरी, आता जलप्रवासाचे एक नवे पर्व सुरू होणार आहे. मुंबई ते अलिबाग रो-रो फेरीच्या यशस्वी प्रयोगानंतर, महाराष्ट्र सरकारने १ सप्टेंबरपासून मुंबई ते कोकणदरम्यान आणखी एक रो-रो फेरी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा सागरी मार्ग कोकण प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करणारा ठरेल. मुंबई-गोवा महामार्गावरील गर्दीचा अनुभव घेतलेल्यांना या नव्या सेवेचे महत्त्व नक्कीच पटेल. गणेश चतुर्थी आणि होळीसारख्या सणांदरम्यान महामार्गावर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरते. यावर मुंबई ते कोकणदरम्यान सुरू होणारी नवी रो-रो फेरी एक उत्तम उपाय ठरेल यामुळे प्रवाशांना रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळता येणार आहे.

mumbai to ratnagiri ro ro ferry
RORO Ferry Service: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खुशखबर! लवकरच सुरु होतेय मुंबई-सिंधुदुर्ग 'रो-रो'सेवा; किती पैसे मोजावे लागणार?

प्रवासाच्या वेळेत मोठी बचत

या नव्या सेवेमुळे आता रत्नागिरीला फक्त ३ तासांत आणि सिंधुदुर्गला ५ तासांत पोहोचता येणार आहे. सध्या मुंबई ते कोकण प्रवासाला १० ते १२ तास लागतात, पण आता हा वेळ ५० टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. मुंबई-अलिबाग फेरी सेवेच्या यशावर आधारित हा प्रकल्प आहे, ज्यामुळे ३ तासांचा रस्ता प्रवास केवळ १ तासात समुद्रातून पूर्ण होतो. नवी मुंबई-कोकण फेरी सेवा याच संकल्पनेवर आधारित असून, हे एक मोठ्या सागरी जलमार्ग प्रणालीचा भाग आहे.

भविष्यात गोवा प्रवासाची योजना

मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, ही तर केवळ सुरुवात आहे. भविष्यात श्रीवर्धन, जयगड, मांडवा आणि त्यानंतर गोव्यापर्यंत ही फेरी सेवा वाढवण्याची योजना आखण्यात येईल. महामार्गाचा वापर न करता थेट मुंबईहून गोव्याला जलमार्गाने जाण्याची कल्पना आता प्रत्यक्षात येऊ शकते.

या फेरीमध्ये प्रवाशांसाठी विविध श्रेणींचे तिकीट उपलब्ध आहेत:

  • फर्स्ट क्लास (रु. ९,०००)

  • बिझनेस क्लास (रु. ७,५००)

  • प्रीमियम इकोनॉमी (रु. ४,०००)

  • इकोनॉमी (रु. २,५००)

वाहनांसाठी देखील वाहतुकीची सोय:

  • कारसाठी रु. ६,०००

  • दुचाकीसाठी रु. १,०००

  • सायकलसाठी रु. ६००

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com