MLA Digambar Kamat: देवाने सांगितल्यामुळे मी काँग्रेस सोडली

देवाला विचारूनच मी भाजपात प्रवेशाचा निर्णय घेतला
Digambar Kamat
Digambar KamatTwitter/ ANI

गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून गेले कित्येक महिने काँग्रेसला भगदाड पडणार असल्याची चर्चा सुरु होती. या चर्चेला आज पुर्णविराम मिळाला आहे. सकाळी 8 काँग्रेस आमदारांनी आपण भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचं स्पष्ट केले. यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी देवाने सांगितल्यामुळे काँग्रेस सोडली असल्याचं वक्तव्य केले आहे.

(MLA Digambar Kamat clams God instruct him to join bjp)

Digambar Kamat
Goa Congress Rebel: काँग्रेसमध्ये माझी घुसमट; अनेकांच्या विश्‍वासाला तडा!

कामत म्हणाले की, पितृपक्ष भाद्रपद महिन्यात येतो आणि भाद्रपद हा अतिशय महत्त्वाचा महिना आहे. याचा विचार करून आणि देवाला विचारूनच मी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे कामत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत गोवा काँग्रेस काय प्रतिउत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Digambar Kamat
Digambar Kamat: 'भारत जोडो पेक्षा काँग्रेस जोडो'वर काँग्रेसने लक्ष देण्याची गरज - दिगंबर कामत

काँग्रेस स्थिर करण्यासाठी आपण समर्थक - युरी आलेमाव

मोठ्या संख्येने गोवा काँग्रेसचे आमदार भाजपात प्रवेश करतायेत या स्थितीवर बोलताना मी प्रशिक्षित पायलट आहे. भरकटलेले विमान स्थिर कसे करावे याचे प्रशिक्षण मी घेतले आहे. अशा शब्दात कुंकळीचे आमदार युरी आलेमाव यांनी आजच्या राजकीय घटनेवर प्रतिक्रिया दिली.

सासष्टी तालुका गोव्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसमुक्त करण्यासाठी भाजपने 'मिशन लोटस' पुढे आणले होते. मात्र कुंकळीचे आमदार युरी आलेमाव बळी न पडल्याने सासष्टी तालुका काँग्रेसमुक्त होण्यापासून वाचला. असे जरी असले तरी पहिल्यांदाच या एकेकाळच्या काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या तालुक्यात काँग्रेस आमदारांची संख्या एकवर आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com