Goa Politics Latest Update| गोव्यातून काँग्रेस छोडो यात्रेला सुरुवात- CM

मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भाजपने आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि पक्षाचे इतर नेते यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या 8 आमदारांचा औपचारिकपणे पक्षात समावेश केला. मायकेल लोबो, दिगंबर कामत, अलेक्सो सिक्वेरा, केदार नाईक, राजेश फळदेसाई, रुडॉल्फ फर्नांडिस, संकल्प आमोणकर आणि दिलायला लोबो या आठही माजी काँग्रेस आमदारांनी भाजपचे प्राथमिक सदस्यत्व घेतले.

(Congress Chodo Yatra has commenced from Goa says CM pramod sawant)

Goa Politics
Goa Michel Lobo|'काँग्रेस छोडो, भाजप जोडो'; भाजपमय मायकल लोबोंचा नवा नारा

“काँग्रेसने देशव्यापी भारत जोडो (एकता भारत) यात्रा सुरू केली आहे. परंतु, काँग्रेस सोडो यात्रेला गोव्यातून सुरुवात झाली असून, त्याचे अनुकरण देशाच्या इतर भागातही होणार आहे, असे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

पक्षात प्रवेश करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार का, असा प्रश्न विचारला असता सावंत म्हणाले की, मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर आणि दक्षिण गोव्यातील दोन्ही जागा भाजप गोव्यात जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी 400 हून अधिक जागा जिंकतील, असेही ते म्हणाले. नवीन राज्य विधानसभेची रचना खालीलप्रमाणे आहे -

28 भाजप आमदारांसह एनडीएचे संख्याबळ 33 आहे, 2 एमजीपी आमदार आणि 3 समर्थक अपक्ष, काँग्रेसकडे 3 आमदार शिल्लक आहेत, गोवा फॉरवर्ड -1, आम आदमी पार्टी -2 आणि रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टी - 1

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Man ChatGPT Viral Video
Goa CM Pramod Sawant accident help
Bori culvert railing damage
Hoysala Dynasty Garuda Lenka Warriors
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com