Mirabhag Bridge Incident: देवा त्याचा थांगपत्ता मिळू दे; नदी उडी घेतलेल्या 'त्या' युवकाचा 30 तासानंतरही शोध सुरुच

Sanvordem Rescue Operation: दिवसभर शोधमोहीम करून सुद्धा बेनी याचा शोध लागला नसल्याने दुसऱ्या दिवशी परत एकदा शोध मोहिमेला सुरुवात झाली
Sanvordem Rescue Operation
Sanvordem Rescue OperationDainik Gomantak
Published on
Updated on

Mirabhag Bridge, Sanvordem Search Operation

केपे: उडेल, पंटेमळ येथील बेनी कुतिन्हो (४४) याने सोमवारी (दि. १३ जानेवारी) सकाळी ९ वाजता मिराबाग सावर्डे येथील पुलावरून झुवारी नदीत उडी घेतली. दिवसभर शोधमोहीम करूनसुद्धा बेनी याचा शोध लागला नसल्याने दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. १४ जानेवारी) रोजी परत एकदा शोध मोहिमेला सुरुवात झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी बेनी याने पुलावरून नदीत उडी घेताना एका मोटारसायकल चालकाने पाहिले आणि त्यांनी त्वरित कुडचडे पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बेनी याचा शोध घेण्यासाठी कुडचडे अग्निशामक दल व किनारी पोलिसांनी प्रयत्न केला.

Sanvordem Rescue Operation
Curchorem News: मुलांच्या आरोग्याशी खेळ! बालरथातूनच नेला कचरा; संतप्त स्थानिक उतरले रस्त्यावर

त्यानंतर नौदलाच्या पाणबुड्यांना पाचारण केले पण बेनी याचा शोध लागला नसल्याने काल उशिरा शोध मोहीम थांबविण्यात आली. पोलीस आणि इतर पथकांनी आज (मंगळवारी) परत एकदा शोधमोहिमेला सुरुवात केली आहे. घटनेला ३० तास उलटून गेले असून देखील अद्याप यश हाती लागत नाहीये.

कुडचडेचे आमदार निलेश काब्राल हे देखील सध्या घटनांसाठी दाखल झाले आहेत. पथकांकडून शोधमोहीम सुरु आहे, आणि लवकरच यात यश मिळण्याची अपेक्षा केली जाऊ शकते अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली. ४४ वर्षीय इसमाचा मृतदेह लवकरत-लवकर सापडावा म्हणून देवाला देखील सांगणं केल्याचं आमदार म्हणाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com