Mirabag: मीराबाग बंधाऱ्याबाबत होणार जनसुनावणी! आंदोलन मागे घेण्याची मंत्री शिरोडकरांची विनंती; काँग्रेसचा ग्रामस्थांना पाठिंबा

Savardem Mirabag: मिरांडा म्हणाले, बराज आणि पंपिंग स्टेशन असा असून पंप केलेले पाणी पंचवाडी येथे धरणात सोडले जाणार आहे. पावसात या बंधाऱ्याची गेट वर काढली जाणार आहे.
Savardem Mirabag
Savardem MirabagDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मीराबाग येथे येणारा बंधारा आणि पंपिंग स्टेशन यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून मागचे काही दिवस तिथे आंदोलन चालू असताना लोकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जनसुनावणी घेतली जाणार आहे.

जलस्रोत खात्याच्या सूत्रांनुसार ही जनसुनावणी २४ किंवा २५ फेब्रुवारीला होऊ शकते. या संदर्भात जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांचीही अभियंत्याशी सखोल चर्चा झाली. या जनसुनावणीच्या वेळी लोकांना या प्रकल्पाची सविस्तर माहिती देणारे पीपीटी प्रेझेंटेशन दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

या संदर्भात जलस्रोत खात्याचे कार्यकारी अभियंते गिप्सन मिरांडा यांची त्यांच्या मडगाव कार्यालयात भेट घेतली असता, जनसुनावणीच्या वेळी आम्ही लोकांच्या सर्व शंकांना उत्तरे देऊ असे त्यांनी सांगितले.

या प्रकल्पाचा जो आराखडा तयार केला आहे, त्यानुसार हे पाणी कुठल्याही व्यावसायिक आस्थापनाला देण्यासाठी नव्हे तर पंचवाडी आणि इतर भागात राहणाऱ्या लोकांना पाणी पुरवठा करण्यासाठी आहे असे त्यांनी सांगितले.

मिरांडा म्हणाले, बराज आणि पंपिंग स्टेशन असा असून पंप केलेले पाणी पंचवाडी येथे धरणात सोडले जाणार आहे. पावसात या बंधाऱ्याची गेट वर काढली जाणार आहे. त्यामुळे पावसात या भागात पूर येणार अशी जी भीती स्थानिकांना वाटते ती खरी नाही.

आंदोलन मागे घ्या!

मीराबाग येथील बंधाऱ्याचे पाणी पंचवाडी अन्य भागांना पुरविले जाणार आहे. पुढील ५० वर्षांची गरज लक्षात धरून या प्रकल्पाची क्षमता ६० एमएलडी अशी ठेवली आहे. असे जरी असले तरी जेवढ्या पाण्याची गरज आहे दरम्यान, लोकांना विश्वासात घेतल्या शिवाय हा प्रकल्प सुरू केला जाणार नाही, असे आश्वासन जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिले असून लोकांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.

Savardem Mirabag
Mirabag Savarde: 'अन्यथा आमची दैवते अन गावे पाण्याखाली जातील'! मीराबाग-सावर्डेत बंधाऱ्याविरुद्ध आंदोलन; राखणदाराला घातले गाऱ्हाणे

काँग्रेसचा पाठिंबा

मीराबाग येथे होऊ घातलेल्या बंधाऱ्याचे पाणी केवळ म्हैसाळ धरणासाठीच असेल, तर मग शिल्लक पाणी कोणाच्या प्रकल्पासाठी असेल याची माहिती जनतेला आधी देणे आवश्यक आहे. जनतेला फसवून गावातील घरे दारे आणि धार्मिक स्थळे बुडवून प्रकल्प सुरू करण्यासाठी जर गाव पाण्याखाली घालत असाल, तर काँग्रेस पक्ष पूर्णपणे मीराबाग येथील धरणाविरुद्धच्या आंदोलनास पाठिंबा देण्यास मागे हटणार नसल्याचा इशारा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी दिला.

Savardem Mirabag
Mirabag: '..आम्ही रस्त्यावर उतरू, न्यायालयात जाऊ'! जुवारी नदीवरील बंधाऱ्याविरोधात एल्गार, मिराबाग येथे ग्रामस्थांची बैठक

आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी पाटकर गेले असता त्यांनी सांगितले, की म्हैसाळ धरणाची क्षमता दहा एम. एल. डी. आहे मग शिल्लक पाणी कोणाला देण्याचा घाट घातला जात आहे. या प्रकल्पाविरोधात काँग्रेस पक्ष विधानसेभेत आणि लोकसभेत आवाज उठविणार आहे. संकेत भंडारी म्हणाले, आम्हाला कोणताही बंधारा नको आहे. सरकारने आमची सहनशीलता न पाहता प्रकल्प रद्द करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com