Mirabag: '..आम्ही रस्त्यावर उतरू, न्यायालयात जाऊ'! जुवारी नदीवरील बंधाऱ्याविरोधात एल्गार, मिराबाग येथे ग्रामस्थांची बैठक

Mirabag Villagers Protest: गणपती विसर्जन स्थळाजवळच घेतलेल्या बैठकीत मिराबागच्या गावकऱ्यांव्यतिरिक्त मुगोळी, माडेल, फळणे, धडे आणि इतर भागांतील ग्रामस्थांनी प्रस्तावाला विरोध केला.
Mirabag villagers protest
Mirabag villagers protestDainik Gomatnak
Published on
Updated on

केपे: मिराबाग येथे जुवारी नदीवर प्रस्तावित बंधाऱ्याविरोधात लढण्यासाठी ग्रामस्थांनी पुन्हा कंबर कसली आहे. शुक्रवारी गणपती विसर्जन स्थळाजवळच घेतलेल्या बैठकीत मिराबागच्या गावकऱ्यांव्यतिरिक्त मुगोळी, माडेल, फळणे, धडे आणि इतर भागांतील ग्रामस्थांनी प्रस्तावाला विरोध केला.

गावकऱ्यांनी एकमताने या बंधाऱ्याविरोधात ठराव घेतला. लोकांच्या विरोधाला न जुमानता हे काम सुरू झाले तर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला आहे. गरज पडल्यास न्यायालयात जाण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

मंगलदास नाईक यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी आम्ही या बंधाऱ्याविरोधात आवाज उठवला होता. विरोधामुळे बंधाऱ्याचे ठिकाण एक किलोमीटर वरच्या बाजूला हलवण्यात आले होते. परंतु, आता जलसंपदा विभागाने पूर्वी ठरल्याप्रमाणे हा प्रकल्प मिराबाग येथेच उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही पुन्हा या विरोधात लढा देणार आहोत.

Mirabag villagers protest
Chimbel Unity Mall: युनिटी मॉलवरून वाद पेटला! चिंबल ग्रामस्थांची आक्रमक भूमिका; सर्वेक्षण ढकलले पुढे

काय म्हणाले ग्रामस्थ...

सरकारने जर आम्हाला विश्वासात न घेता प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला, तर आम्ही मतपेटीद्वारे सरकारला धडा शिकवू. या जुवारी नदीला भरती आणि ओहोटी दोन्ही येते. भरतीच्या वेळी पाणी सांगे मधील संगमेश्वरपर्यंत येते. जर बंधारा बांधला गेला, तर भरतीच्या वेळी पाणी कुठे जाईल? असा प्रश्न संकेत भंडारी या तरुणाने उपस्थित केला.

Mirabag villagers protest
Illegal Stone Mining: मिराबाग येथील बेकायदा चिरेखाणीवर खाण खात्याची मोठी कारवाई; करोडोंची यंत्रसामग्री जप्त

उपेंद्र नाईक म्हणाले की, सरकार आणि जलसंपदा विभाग आम्हाला अंधारात ठेवून हा बंधारा बांधू इच्छित आहेत. कारण, जर आम्हाला बंधाऱ्याचे परिणाम कळले, तर आम्ही प्रकल्पाला विरोध करू. कोणतीही जनसुनावणी नाही, मातीची तपासणी नाही, पर्यावरणाची मंजुरी नाही आणि हा प्रकल्प २८० कोटी रुपयांच्या खर्चाने बांधला जात आहे.

आम्ही आमदार गणेश गावकर यांची भेट घेणार आहोत आणि त्यानंतर पुढील कृती आराखडा ठरवणार असल्याचे उपेंद्र नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com